
Video: मॉडेल पूनम पांडे जिवंत, मृ्त्यूची पोस्टचं सांगितलं कारण…
मुंबई : मॉडेल पूनम पांडे हिची इन्स्टाग्राम अकाउंटवर शुक्रवारी (ता. २) मृत्यू पोस्ट प्रसिद्ध झाल्यानंतर खळबळ उडाली होती. पण आता तिने स्वत:च समोर येत आपण जिवंत असल्याचे सांगितले आहे. शिवाय, त्या पोस्टचे कारणही तिने शेअर केले आहे. मी जिवंत आहे आणि मला गर्भाशयाचा कर्करोग झालेला नाही. पण दुर्दैवाने या रोगाचा सामना करावा लागणाऱ्या हजारो महिलांचा यामुळे मृत्यू होत आहे. या आजाराशी लढण्यासाठी #DeathToCervicalCancer मोहिम सुरू केल्याचे तिने सांगितले आहे.
पूनम पांडे हिने सोशल मीडिया पेजवर लाइव्ह येत मृत्यूच्या बातमीबद्दल माफीही मागितली आहे. कर्करोगाबाबत जनजागृतीसाठी असे केल्याचे तिने म्हटले आहे. तिच्या मृत्यूच्या पोस्टने निर्माण झालेल्या प्रश्न, शंका कुशंकांना तिने उत्तर दिले आहे. पूनम पांडे हिने म्हटले की, ‘गर्भाशयाच्या कर्करोगाने माझा मृत्यू झालेला नाही. दुर्दैवाने मी त्या शेकडो आणि हजारो महिलांबद्दल हे बोलू शकत नाही ज्यांनी गर्भाशयाच्या कर्करोगाने प्राण गमावला. त्यांना याबाबत माहिती नाही, याबाबत माहिती नाहीय की काय करायचे. मी तुम्हाला हेच सांगण्यासाठी आलेय की इतर कर्करोगांपेक्षा गर्भाशयाचा कर्करोग रोखता येऊ शकतो. तुम्हाला फक्त तुमचे चेकअप करावे लागेल आणि एचपीव्ही लस घ्यावी लागेल.’
पुनम पांडेच्या इन्स्टाग्रामवर शुक्रवारी लिहिण्यात आले होते की, ‘सकाळ आमच्यासाठी खूप कठीण होती. आम्हाला हे सांगताना दु:ख होत आहे की आमची लाडकी पूनमचं सर्वायकल कॅन्सरने निधन झालं आहे. तिच्या संपर्कात आलेल्यांना तिच्याकडून खूप प्रेम मिळालं. या कठीण काळात तिच्या खासगीपणा जपावा अशी आम्ही विनंती करतो.’ दरम्यान, पूनम पांडे हिच्या पोस्टनंतर अनेकांना धक्का बसला होता तर काही जणांनी हे नाटक असल्याच्या प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या.
View this post on Instagram
मॉडेल पूनम पांडे हिचे निधन झाल्याचं वृत्ताने खळबळ….
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

