पुणे शहरात घरफोडी करणारा परराज्यातील अटल गुन्हेगार जेरबंद…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या परराज्यातील अटल गुन्हेगारला आंबेगाव पोलिस स्टेशनच्या पथकाने जेरबंद केले असून, तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. शिवाय, २,२७,००० रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

आंबेगाव बु. येथे १७/०३/२०२५ रोजी करुन चोरी केल्याबाबत आंबेगाव पोलिस ठाणे गु. रजि क्रमांक ४८ / २०२५ बी. एन. एस. ३०५ (अ), ३३१ ( ३ ) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयांत आंबेगाव पोलिस ठाण्याचे तपास पथकाने कसोशीने सी.सी. टि. फुटेजच्या आधारे गुन्हयांतील आरोपीत निष्पण करुन सदर गुन्हयात आरोपी व्यकटेंश रमेश (वय २२, रा. पी. जी बिल्डींग, एमआयटी कॉलेज जवळ, कोथरुड पुणे मुळ राहणार बंगलोर राज्य कर्नाटक) यास अटक केली आहे.

सदर आरोपीत यांच्याकडे तपास करुन खालील प्रमाणे तीन गुन्हे उघडकीस आले आहे.
१) आंबेगाव पोलिस ठाणे गुन्हा रजि क्रमांक ४८/२०२५ बी. एन. एस. ३०५ (अ).३३१ ( ३ )
२) बावधन पोलिस ठाणे पिंपरी चिंचवड गुन्हा रजि क्रमांक १२९/२०२५ बी.एन.एस. ३०५,३३१ (३)
३) लोणीकंद पोलिस ठाणे गुन्हा रजि क्रमांक १०९७/२०२५ बी. एन. एस. ३०५,३३१ (३)
सदर आरोपी कडून एकूण २,२७,०००/- रुपये किंमतीचे दागिने जप्त केले आहे. सदर गुन्हयांचा अधिक तपास आंबेगाव पोलिस स्टेशन तपास पथकाचे पोउनि मोहन कळमकर हे करत आहेत.

सदरची कारवाई अपर पोलिस आयुकत पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे प्रविणकुमार पाटील, पोलिस उप आयुक्त परिमंडळ २ पुणे स्मार्तना पाटील सहा. पोलिस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने, पोलिस उप निरीक्षक मोहन कळमकर, पोलिस अंमलदार शैलेंद्र साठे, हनमंत मासाळ, चेतन गोरे, निलेश जमदाडे धनाजी धोत्रे, प्रमोद भोसले, सुभाष मोरे, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, समाधान कांबळे यांच्या पथकाने केली आहे.

पुणे! पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा; अनैतिक संबध…

पुणे! माजी नगरसेविकेच्या मुलाने आळंदीला नेऊन केलं लग्न अन् तीनवेळा गर्भपात…

पुणे! चहाच्या टपरीवर सिलिंडरचा स्फोट; अनाथ संतोष पहिल्याच दिवशी होरपळून मृत्यू…

पुणे! हडपसर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ३ दुचाकी वाहने आणि ३८ मोबाईल हस्तगत…

पुणे! अंमली पदार्थ विरोधी पथक ०२, गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!