अधिकाऱ्यांनी युवतीकडे केली शरीरसुखाची मागणी; चेंबरमध्ये बोलावले अन्…
अकोला : अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण एका महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी दोन अभियंत्यांवर विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींमध्ये शाखा अभियंता आर इंगळे आणि उपअभियंता डी. बी. कपिले यांचा समावेश आहे. पीडीत महिलेला पगार काढणे आणि पगारात वाढ करण्यासाठी या दोघांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप पोलिस तक्रारीत केरण्यात आला आहे. याप्रकरणी मुर्तिजापूर शहर पोलिसांनी दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत.
‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
पीडित युवतीच्या तक्रारीवरून मुर्तिजापूर पोलिसांत दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा संपूर्ण प्रकार मुर्तिजापूरातील जीवन प्राधिकरण कार्यलयात घडला होता. दोन्ही अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. मूर्तिजापूर शहरातल्या जीवन प्राधिकरण उपविभागीय अभियंता कार्यालयात युवती (वय 29) कंत्राटी कंम्प्युटर आपरेटर म्हणून कार्यरत आहे. मागील महिन्यांपासून तिचा पगार थकीत आहे. त्यात पगरात वाढ व्हावी, म्हणून पीडित युवतीने कार्यलयातील शाखा अभियंता डी.बी. कपिले यांच्याकडे पगार वाढीसाठी विनवणी केल्या. मात्र पाहिजे तसा प्रतिसाद अधिकारी देत नव्हते.
अखेर दुय्यम अधिकारी आर इंगळे यांना ती भेटली. पगार काढण्यासाठी युवतीकडे शरीरसुखाची मागणी केली. तसेच 20 जून रोजी कपिले याने चेंबरमध्ये युवतीला बोलवले असता युवती एकटी असल्याची संधी साधत तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. युवतीने त्याला विरोध केला असता कामावरून काढून टाकण्याची धमकी अधिकारी देऊ लागला. अखेर युवतीने घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबीयांनी मुर्तिजापूर पोलिस स्टेशन गाठले. युवतीच्या तक्रारीवरून शाखा अभियंता डी.बी. कपिले आणि आर. इंगळे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
Video: प्राचार्य आणि शिक्षिकेचा शाळेतच रोमान्स; व्हिडिओ व्हायरल…
प्राध्यापकाने सहकारी महिला प्राध्यापिकेचा केला विनयभंग…
सरपंचाने केला शौचालयास गेलेल्या महिलेचा विनयभंग…
धक्कादायक! डॉक्टरने उपचारासाठी आलेल्या महिलेचा केला विनयभंग…
प्राध्यापकाने विमानात केला डॉक्टर युवतीचा विनयभंग…