
धक्कादायक! लग्नासाठी तयार होत असलेल्या प्रेयसीचा पाठलाग केला अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश) : झाशीमध्ये एका नववधूची तिच्या प्रियकराने गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. २३) घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
प्रियकराने आपल्या प्रेयसीला रविवारी सायंकाळी उशिरा ब्युटी पार्लरमध्ये जाताना पाहिले होते. शिवाय, तिचे लग्न होणार असल्याचे समजल्यानंतर त्याचा संयम सुटला. मध्य प्रदेशातील सोनागिरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून प्रेयसीचा पाठलाग केल्यानंतर त्याने झाशी येथील ब्युटी पार्लरमध्ये तिच्यावर गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून पळ काढला. वधूला तात्काळ रुग्णालयात नेलं. मात्र, तिचा मृत्यू झाला.
प्रियकर आणि युवती दोघेही मध्य प्रदेशातील सोनगिरी पोलिस स्टेशन हद्दीतील वरगाये गावचे रहिवासी होते. आरोपी प्रियकर दीपक अहिरवार याचे काजल नावाच्या युवतीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, प्रियकर दीपकला काजल आपल्यापासून दूर जाऊ लागल्याचं जाणवलं. दोघांमध्ये अनेकदा वाद झाले होते. दरम्यान, काजलचे लग्न झाशीतील तिच्या कुटुंबीयांनी दुसरीकडेच ठरवले होते.
काजल हिचे रविवारी लग्न होणार होते. काजल ही मेकअप करण्यासाठी सिपरी बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आयटीआयजवळील ब्युटी पार्लरमध्ये गेली होती. प्रियकर दीपक काजलचा पाठलाग करत झाशीला गेला. काजल ब्युटी पार्लरमध्ये गेल्यानंतर तिचा पाठलाग करणाऱ्या दीपकने पार्लरमध्ये बसलेल्या त्याच्या प्रेयसीला गोळ्या घालून ठार मारले. यानंतर तो बंदूक घेऊन पळून गेला. या घटनेनंतर लग्नघरात शोककळा पसरली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
क्यों किया ऐसा मेरे साथ? प्रेयसीला लोखंडी पान्याचे 15 घाव घालून संपवलं…
महाराष्ट्र हादरला! प्रेयसीच्या डोक्यात दगड घालून केला खून…
धक्कादायक! प्रियकराने प्रेयसीला OYO रूमवर बोलावले अन् पुढे…
प्रेयसीच्या गालावर गरम लोखंडी रॉडने लिहिलं स्वतःचं नाव…
प्रेयसीच्या साखरपुड्यानंतर नवऱ्याच्या घराच्या गेटला लावली बॉम्बसदृश वस्तू अन् पुढे…

