अहमदनगर जिल्ह्यात सिमरनने 8 महिन्यांत केली 9 लग्न; अखेर डाव फसला…

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा पोलिसांनी मुलीचं लग्न लावून देणाऱ्या एका टोळीला जेरबंद केले आहे. सिमरन नावाच्या युवतीने आठ महिन्यात नऊ मुलांसोबत लग्न केली होती. पण, एका घटनेत महिलेच्या सतर्कतेमुळे अलगद जाळ्यात अडकली.

श्रीगोंदा तालुक्यातील मुंगुसगाव येथील एका युवकाकडून दोन लाख 15 हजार रुपये घेऊन त्याचे सिमरन नावाच्या मुलीशी लग्न करण्यात आले. लग्नानंतर लगेचच या मुलीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, उगले कुटुंबीयांच्या सतर्कतेमुळे पळून जाणाऱ्या मुलीसह टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. श्रीगोंदा पोलिसांनी पकडलेल्या सिमरनने आठ महिन्यांत तब्बल 9 तरुणांशी लग्न करून त्यांना लाखो रुपयांना फसवल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

पोलिसांनी नवरीची भूमिका निभावणाऱ्या सिमरन गौतम पाटील हिच्यासह तिची आई आणि इतर पाच अशा एकूण 7 आरोपींना गजाआड केले आहे. पोलिस तपासात या टोळीचे अनेक कारनामे समोर आले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील सिमरन हिने तिची आई आणि इतर 5 साथीदारांसह गुजरात, मध्य प्रदेश, हैदराबाद, मुंबई आदी ठिकाणी लग्नाळू मुलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठ मोठ्या रकमा घेऊन त्यांची फसवणूक केली आहे. या टोळीने आणखी दोन युवकांना फसविण्याचा कट रचला होता. मात्र, त्या आधीच मुंगुसगाव प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या ठगांना गजाआड केले. याप्रकरणी मुंगुसगाव येथील तरुणाने 28 जून रोजी फिर्याद दिली होती. त्यानुसार, पोलिसांनी या टोळीचा तपास सुरू करुन टोळीला अटक केली. पोलिसांनी या टोळीकडून फसवून घेतलेली रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेले वाहन, असा एकूण 13 लाख 7 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी न्यायालयाने आरोपींना 11 दिवसांची कोठडी दिली आहे.

लग्नाळू मुलांना हेरायचे आणि लग्नाचे आमिष दाखवून त्यांना फसवायचे काम ही टोळी करत होती. श्रीगोंदा तालुक्यातील मुंगुसगाव येथील नितीन उलगे या शेतकरी युवकाला अशाच पद्धतीने या टोळीने हेरले आणि त्यांची फसवणूक केली. लग्न झाल्यानंतर नवरा मुलगा असलेल्या नितीनच्या आईला या टोळीवर संशय आला होता. त्या संबंधित माय लेकीवर लक्ष ठेवूनच होत्या. लग्नाची नोटरी करण्याच्या बहाण्याने सिमरनची आई आशा पाटील हिने नितीनच्या कुटुंबियांना श्रीगोंदा येथे नेले. साथीदारांच्या मदतीने पळून जाण्याचा त्यांचा डाव होता. मात्र, नितीनची आई मंदाबाई उगले यांनी हा डाव हाणून पाडला.

स्थानिक नागरिकांच्या मदतीने उगले कुटुंबियांनी आशा गौतम पाटील, सिमरन गौतम पाटील, शेख शाहरूख शेख फरीद, दीपक पाडुरंग देशमुख, अर्जुन रामराव पाटील ऊर्फ कर्णन गौतम पाटील ,सचिन बलदेव राठोड ऊर्फ राजूरामराव राठोड , युवराज नामदेव जाधव यांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

नवरा तिसरं लग्न करत असतानाच दोघी मंडपात पोहोचल्या अन्…

पत्नी पाचव्यांदा लग्न करत समजल्यावर चौथ्या पतीने उचलले मोठे पाऊल…

धक्कादायक! लग्नानंतर नवरीने पाचव्या दिवशीच दाखवला खरा चेहरा…

धक्कादायक! लग्नानंतर 7व्या दिवशी प्रियकरासह पळाली नवरी; जाण्यापूर्वी..

राजाबाबू! डॉक्टर तर कधी अधिकारी सांगून 6 महिलांशी केली लग्न अन्…

दोघांना सोडलं, तिसऱ्याची हत्या अन् चौथं लग्न करायला निघाली…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!