
पुणे शहरात नायलॉन मांजा ठरतोय जीवघेणा; पत्रकाराच्या पत्नीसह दोन महिला जखमी…
पुणे : पुणे शहरात नायलॉन मांजामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. तर काही जणांना जीव गमवावा लागला आहे. कोंढवा बुद्रुक परिसरात नायलॉन मांजामुळे पत्रकार संदिप कद्रे यांच्या पत्नीसह दोन महिला जखमी झाल्या आहेत. नायलॉन मांजाला बंदी घालण्यासाठी प्रशासनाकडे कडक पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.
कोंढवा बुद्रुक येथील शांतीनगर सोसायटी येथील नातलगांना भेटुन घरी जाताना ज्योती कद्रे या गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास सासुबाई यांना सोबत घेऊन दुचाकीने निघाल्या होत्या. यावेळी नायलॉन मांजाने त्यांच्या मानेला मोठी दुखापत झाली. खाजगी रुग्णालयात जाऊन त्यांनी उपचार घेतला. शिवाय, दुचाकीवरील अन्य दोन महिला नायलॉन मांजामुळे जखमी झाल्या आहेत. पुणे शहरातील विविध भागांमध्ये नायलॉन मांजामुळे दुखापतीच्या घटना घडत आहेत.
प्रशासन अधिकारी आणि पोलिसांच्या निष्काळजी पणामुळे अनेकांना दुखापत होताना दिसत आहे. या मांजाच्या विक्रीवर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे सर्रास विक्री होत असल्याचे दिसत आहे. गेल्या पाच वर्षात केवळ १६ गुन्हे झाले आहेत. २०१७ पासून हानिकारक नायलॉन मांजाचे उत्पादन, विक्री व वापरावर बंदी घालण्यात आली आहे. बारीक काचेचा लेपित धागा असणारा हा नायलॉन मांजा पुणे शहरात सर्रास विकला जात आहे. पुणे शहरात गेल्या पाच वर्षांत नायलॉन मांजाचे किमान १६ गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहे. २०२३ मध्ये सर्वाधिक ७ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. २०२४ मध्ये पोलिसांनी चार गुन्हे दाखल केले आहेत. तर पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र सरकारने मानव, प्राणी आणि पर्यावरणाच्या सुरक्षेचा हवाला देत पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाच्या धाग्यांचे उत्पादन, विक्री आणि वापर करण्यावर बंदी घालणारी अधिसूचना जारी केली होती. सरकारने बंदीचे उल्लंघन केल्याबद्दल दंड देखील ठोठावला आहे. ज्यामध्ये ५ हजार रुपयापर्यंत दंड आणि ३ वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाचा देखील समावेश आहे. विशेषत: मकरसंक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने पतंग उडवताना या धाग्याचा वापर केला जातो. झाडांमध्ये किंवा रस्त्याच्या कडेला अडकलेला या मांजामुळे अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. यात सर्वाधित फटका पशू पक्षांना बसला आहे. दरम्यान, मकर संक्रांतीचा सण जवळ आल्याने पुणे पोलिसांनी शहरातील बंदी असलेल्या मांजाच्या विक्रीला आळा घालण्यासाठी कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
हृदयद्रावक! पोलिसकाकाचा मांजाने चिरला गळा…
सहकारनगर पोलिसांनी नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्याला केले जेरबंद…
शरद मोहोळ याच्या हत्येचा घेणार होते बदला; पुणे पोलिसांनी मोठा कट उधळला…
पुणे विमानतळाजवळ दीर-भावजयीचा अपघाती मृत्यू…
पुणे! आमच्या आधी मटण का खालं? मित्राने घातला डोक्यात फावडा…

