पुणे-सोलापूर रस्त्यावर लूटमार करायचे अन् पैसे कला केंद्रात उडवायचे; सहा जणांना अटक…

पुणे: पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रकचालकांना लुटणाऱ्या टोळीविरोधात दौंड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी गुरुवारी (ता. १२) मध्यरात्री जामखेड येथील कला केंद्रावर सापळा रचून सहा जणांना अटक केली आहे. हे सर्व आरोपी पुणे-सोलापूर महामार्गावर रात्रीच्या वेळी दबा धरून बसायचे आणि ट्रकचालकांना दमदाटी आणि मारहाण करून लुटायचे. यानंतर लुटलेला पैसा आरोपी जामखेड येथील कला केंद्रात जाऊन उडवत होते. पोलिसांनी सहाही आरोपींना रंगेहाथ अटक केली आहे.

7 डिसेंबर 2024 रोजी ची घटना रात्रीच्या साडेअकरा वाजता च्या दरम्यान मालवाहतूक चालक जेजुरी वरून बेंगलोर कडे जात असताना एका बोलेरो जीपने ट्रकचा पाठलाग केला. एक किलोमीटर पाठलाग करत स्वामी चिंचोली हद्दीतील मल्लिनाथ मठासमोर जीप आडवी लावून ट्रक चालकाला व मालकाला लोखंडी टॉमी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत चालकाच्या खिशातील 33 हजारांची रक्कम जबरदस्तीने चोरून नेले व ही बोलेरो जीप राशीन मार्गाकडे निघून गेली. याचा गुन्हा दाखल होताच दौंड चे पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांनी तपास पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील, फौजदार रुपेश कदम व पोलिस अंमलदारांना आरोपींना शोधण्यासाठी रवाना केले.

पोलिसांनी गोपनीय बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित बोलेरो ( MH ४२ AS ६६५८) व संशयित तौफिक रियाज शेख, विक्रम बाळासो माडगे (दोन्ही रा. भिगवण ता. इंदापूर जि. पुणे), 3. शरद अशोक धेंडे,4. हनुमंत रामभाऊ गायकवाड, 5. अमोल गौतम गायकवाड व 6. भिकाजी वाल्मीक धेंडे (वरील चारही रा. जिंती ता. करमाळा जि. सोलापूर) यांना जामखेड येथील कला केंद्र येथून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्यात वरील आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. गुन्ह्यात वापरलेली बोलेरो गाडी, लोखंडी टॉमी व रोख रक्कम असा ६ लाख १ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्यात चोरले उर्वरित रकमेबाबत पुढील तपास सहाय्यक निरीक्षक नागनाथ पाटील हे करीत आहेत. सहा जणांपैकी तीन जणांवर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. यापैकी तोफिक रियाज शेख याच्यावर भिगवण पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह व शस्त्राच्या गुण्यासह सात गुन्हे दाखल असून दौंड पोलिस ठाण्यात देखील अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या गुन्ह्यासह ९ गुन्हे दाखल आहेत. तर त्याचा साथीदार विक्रम बाळासाहेब माडगे याच्यावर भिगवण व करमाळा येथे तीन गुन्हे दाखल आहेत. शरद भेंडे याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत यामध्ये एक पोस्को गुन्ह्याचा देखील समावेश आहे.

संबंधित कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक, गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस व दौंड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील, फौजदार रुपेश कदम, सहाय्यक फौजदार श्रीरंग शिंदे, मलगुंडे, पोलिस हवालदार अतुल पठाण, संजय नगरे, नवनाथ भागवत, अमोल नरोटे, गजानन शिंदे, साळुंखे, मोघे, अंमलदार सागर म्हेत्रे, रमेश कर्चे यांनी केली.

पुणे शहरात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट झाल्याने पोलिसकाका जखमी…

भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा शेजाऱ्यानेच केला घात…

महाराष्ट्रात वाहनांशी संबंधित नियम बदलणार; अन्यथा 10 हजार रुपयांचा दंड…

महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

पोलिस असलेल्या वर्गमित्राने मैत्रिणीची हत्या केली अन् मृतदेह…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!