नवरदेवाची मैत्रीण ऐनवेळी घरी पोहचल्याचे नवरीला समजले अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये एका विवाह सोहळ्याची तयारी झाली होती. पण, ऐनवेळी नवरदेवाची मैत्रीण त्याच्या घरी पोहचल्याचे नवरीला समजले. नवरीने नवरदेवाला घरी बोलावून घेतले आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी नवरदेवाला ताब्यात घेतले होते. संबंधित घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

जलालाबाद येथील रहिवासी असलेल्या युवतीचे लग्न ठरले होते. गुरुवारी लग्नाची वरात येणार होती. मात्र रात्री उशिरापर्यंत लग्नाची वरात न आल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाच्या कुटुंबीयांना फोन केला. पण कॉलला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर बराच वेळ गेल्याने लग्नासाठी आलेले पाहुणेही परत गेले. हे सर्व पाहून नवरीला वाईट वाटले.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

दुसरीकडे एटा येथील नवरदेवाची मैत्रीण त्याच्या घरी पोहोचली आणि लग्नासाठी हट्ट करू लागली. त्यामुळे वरात पोहोचू शकली नव्हती. शुक्रवारी पहाटे ४ वाजता वधूने वराला फोन केला आणि म्हटलं, ‘आपण लग्न करू, तू फक्त तुमच्या कुटुंबातील सदस्य आणि काही नातेवाईकांना घेऊन ये. मी वाट पाहत आहे.’ हे ऐकून मुलगा खूप खूश झाला आणि त्याने आपल्या कुटुंबीयांना सांगितले की मुलगी आणि तिचे कुटुंबीय अद्याप लग्नासाठी तयार आहेत. यानंतर मुलगा काही नातेवाईकांसह मुलीच्या घरी पोहोचला.

नवरदेव आणि त्याचे साथीदार येताच मुलीने पोलिसांना बोलावले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्याला अटक केली. दोन्ही बाजूच्या नातेवाईकांनी एकमेकांशी चर्चा केल्यानंतर सायंकाळी उशिरा पोलिसांनी त्या नवरदेवाला सोडून दिले. संबंधित लग्नाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

धक्कादायक! लग्नानंतर दोन तासातच नवरदेवाने उचलले मोठे पाऊल…

हृदयद्रावक! लग्नानंतर चौथ्याच दिवशी नवरदेवाचा मृत्यू…

प्रेमविवाह ठरला अन् लग्नाच्या दिवशी नवरदेवाने ठोकली मेहुणीसोबत धूम…

बायकोच्या हट्टापायी नवऱ्याचा गेला मध्यरात्रीच जीव…

अनैतिक संबंध! मध्यरात्री पत्नी बेपत्ता झाली अन् एका कॉल आला…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!