प्रेम, लग्न आणि पत्नीचे उच्च शिक्षण; पत्नी म्हणते कोण तो? ओळखत नाही…

लखनौ (उत्तर प्रदेश): झाशीमध्ये एका पतीने काबाडकष्ट करून शिकवले. पण, पत्नी अकाउंटंट झाल्यानंतर तिने पतीला सोडले आहे. पत्नीसाठी तो आता पोलिस आणि इतर अधिकाऱ्यांकडे फेऱ्या मारत आहे. पण, न्याय मिळाला नाही. नीरज विश्वकर्मा असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव असून तो सुतारीकाम करत आहे.

पतीने सुतारकाम करून पत्नीला शिकवलं आणि पत्नी अकाउंटंट झाल्यावर तिला सरकारी नोकरी मिळाली आणि त्याला सोडून गेली आहे. दोघांचे ५ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. नीरज याची रिचा नावाच्या मुलीशी भेट झाली. काही दिवसातच त्यांच्या भेटीचं रुपांतर प्रेमात झाले. रिचाने पुढे शिक्षण घेऊन अधिकारी बनण्याची इच्छा व्यक्त केली. प्रियकर नीरजनेही साथ देत मेहनत करायला सुरुवात केली. रिचा हिने सुद्धा अभ्यास करत मोठी झेप घेतली. अकाउंटंट झाल्यानंतर तिने नीरजची साथ सोडली आहे. नीरज रिचाच्या शोधात जिल्हाधिकारी कार्यालयात फेऱ्या मारत आहे.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

दरम्यान, झाशीच्या सत्यम कॉलनीत राहणाऱ्या रिचा सोनी हिला तो एका मित्राच्या घरी ५ वर्षांपूर्वी भेटला होता. त्यानंतर दोघांनी मंदिरात जाऊन लग्न केले. रिचाला शिकवण्यासाठी तो मजुरीचे काम करायचा. रिचाची अकाउंटंट म्हणून निवड झाल्यावर ती बदलली. यानंतर तिने पतीला सोडलं. त्यानंतर ती आजपर्यंत घरी आलेली नाही. पत्नीला मिळवण्यासाठी त्याने अधिकाऱ्यांपासून पोलिसांपर्यंत चकरा मारल्या, मात्र पत्नी सापडली नाही. पत्नीला जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्तीपत्र मिळाल्याचे समजताच तो तिला भेटण्यासाठी तेथे गेला होता. पण, अपॉइंटमेंट लेटर घेऊन ती गेली पण त्याला भेटली नाही.

नीरज म्हणाला, “मी १८ जानेवारीपासून त्रस्त आहे. माझी पत्नी रिचा सोनी मला सोडून गेली आहे. मी माझ्या पत्नीसाठी सर्वत्र फिरलो आहे. जेव्हा मला हे कळले तेव्हा तिला शोधण्यासाठी मी जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो. रिचाला शिकविण्यासाठी मला खूप अडचणींचा सामना केला आहे. मी कारपेंटर आहे. वाटेल ते काम केलं. रोज ४००-५०० रुपये मिळायचे. तिच्या शिक्षणासाठी कर्ज देखील घेतले. मला तिची खूप आठवण येते. आज ती म्हणते की, आमचं लग्नच झालेले नाही. माझ्याकडे लग्नाचे फोटो आणि सर्टिफिकेट आहे, ते खोटे आहेत का? फेब्रुवारी २०२२ मध्ये ओरछा येथे आमचं लग्न झाले आहे.” दुसरीकडे, आपली बदनामी करण्याचा हा डाव असल्याचं तिने म्हटले आहे. आधी ते प्रेमात पडले, नंतर लग्न झालं आणि त्यानंतर फसवणुकीचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची पोलिस अधिकाऱ्यांकडे नीरजने तक्रार केली आहे.

नाशिकमध्ये प्रेम प्रकरणातून विवाहितेचे टोकाचे पाऊल; सुसाईड नोटमध्ये म्हटले की…

प्रेम! पत्नीने घडवून आणली प्रियकर आणि पतीची भेट अन् पुढे…

शाळेत प्रेम! प्रेमविवाह केलेल्या पती पत्नीचा हृदयद्रावक शेवट…

हृदयद्रावक! पहिल्या नजरेत प्रेम, लग्न अन् अवघ्या ५ महिन्यांची साथ…

नागपूर हादरलं! प्रेमविवाह अन् चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!