
पुणे जिल्ह्यात विहिरीत कोसळला मातीचा ढिगाळा; चौघे अडकले…
पुणे : इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथे विहिरीची रिंग आणि मातीचा ढिगारा कोसळला असून, या ढिगाऱ्याखाली चार जण अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य केले जात आहे.
म्हसोबावाडी गावात विहिरीला रिंग टाकण्याचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक रिंग मारलेला स्लॅबचा भाग आणि मातीचा ढिगारा विहिरीत कोसळला. यामध्ये इंदापूर तालुक्यातील बेलवाडी गावातील चार कामगार ढिगार्याखाली अडकले आहेत. ही घटना मंगळवारी (ता. १) दुपारी घडली. पण, रात्री उशिरा याबाबतची माहिती समजली.
सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय 32), जावेद अकबर मुलानी (वय 30), परशुराम बन्सीलाल चव्हाण (वय 30) आणि मनोज मारुती चव्हाण (वय 40) हे चार जण विहीरित काम करत असताना अचानक रिंग आणि मातीचा ढिगारा कोसळला. ढिगार्याखाली हे चारही जण अडकले आहेत.
दरम्यान, चारही कामगार नेहमीप्रमाणे आपल्या घरी सायंकाळी परतले नाही तेव्हा शोधाशोध सुरू झाली. विहीरीजवळ त्यांच्या दुचाकी गावकऱ्यांना दिसून आल्या. मात्र ते चार लोक आणि त्यांचे मोबाईल मात्र लागू शकले नाहीत. त्यानंतर गावकऱ्यांनी या ढिगार्याखाली हे लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली. काही जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या मदतीने हा ढिगारा आता बाजूला करण्याचे काम सुरू आहे. एनडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
बँक कर्मचारी नीलिमा घरी पोहचलीच नाही; आढळला मृतदेह…
डॉ. आदिनाथ पाटीलने स्वतःला इंजेक्शन घेऊन घेतला जगाचा निरोप…
समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना; 18 जणांचा मृत्यू…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…