
नवविवाहीत महिला सेल्फी घेताना 2000 फूट दरीत कोसळली…
लोणावळा : विवाहानंतर लोणावळा येथे हनिमूनसाठी आलेले जोडपे फिरण्यासाठी बाहेर पडले होते. यावेळी सेल्फी काढताना पाय घसरल्याने माची प्रबळगडावरून खाली पडल्याने नवविवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुभांगी विनायक पटेल (वय २४) असे मृत युवतीचे नाव आहे.
शुभांगी पटेल आणि विनायक यांचे वीस दिवसापूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर दोघे लोणावळा येथे हनिमून साठी 28 डिसेंबर रोजी आले होते. त्या ठिकाणाहून ते दुपारी 2 च्या सुमारास माची प्रबळ येथे ट्रेकिंगसाठी गेले. यावेळी शुभांगी सेल्फी काढत असताना पाय घसरला आणि ती वरून खाली पडली. हा सर्व प्रकार विनायक याच्या डोळ्यासमोरच घडला
शुभांगी अंदाजे दीड ते दोन हजार फूट खाली कोसळली असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. पोलिस आणि स्थानिकांच्या आणि निसर्ग मित्र यांच्या मदतीने या महिलेला बाहेर काढण्यात आले. यावेळी फायर ब्रिगेडला पाचारण करण्यात आले होते. तिला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी रात्री आठच्या सुमारास मृत घोषित केले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे-नाशिक महामार्गावर टेम्पो कारवर कोसळल्याने चौघांचा मृत्यू…
अक्कलकोटवरुन परतताना कार दरीत कोसळली; चौघांचा जागीच मृत्यू…
ताम्हिणी घाटात शाळेच्या सहलीच्या बसला अपघात; दोन महिलांचा मृत्यू…
जेजुरीवरून परतताना रिक्षा पडली विहिरीत; नवविवाहीत दाम्पत्यासह मुलीचा मृत्यू…
नवविवाहीत पत्नीला माहेरी सोडून आला अन् घेतला मोठा निर्णय…
नवविवाहीत दाम्पत्याची आत्महत्या; सुसाईड नोट मध्ये लिहीले…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

