
मुख्याध्यापक पित्याची रेल्वेखाली आत्महत्या; मुलाचा त्रास असह्य…
सोलापूर: मुलाच्या त्रासाला कंटाळून मुख्याध्यापक पित्याने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कुर्डुवाडी-पंढरपूर रेल्वे मार्गावर लऊळ (ता. माढा) परिसरात घडली आहे. बाळासाहेब पितांबर पाटील (वय 56) असे मुख्याध्यापक पित्याचे नाव आहे. ते माढा तालुक्यातील सापटणे भोसे येथील रहिवासी होते. याप्रकरणी मुलगा सौरभ बाळासाहेब पाटील (वय 24) याला अटक करण्यात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
‘मला जॉब नाही, त्यामुळे काहीतरी उद्योगधंदा उभारून द्या,’ असे म्हणून सौरभने वडिलांकडे तगादा लावला होता. तसेच तो वडिलांना शिवीगाळ करून वारंवार मारहाण करत होता. सोमवारी त्याने शिविगाळ करत पुन्हा मुख्याध्यापक असणाऱ्या वडिलांना मारहाण केली. मुलगा वारंवार शिविगाळ आणि मारहाण करत असल्याने मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील यांनी रेल्वे लाइनवर जाऊन रेल्वेपुढे उडी घेतली. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. 31 मार्च दुपारी 03.30 ते दि. 1 एप्रिल रोजी सकाळी कुर्डूवाडी-पंढरपूर रेल्वे मार्गावरील लऊळ शिवारात ढोरे वसतीजवळ ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, सौरभ पाटील याच्या त्रासाला कंटाळून वडिलांनी आत्महत्या केल्याची तक्रार दुसरा मुलगा निखिल पाटील (वय 30) याने पोलिसांत दाखल केली. याप्रकरणी मुलगा सौरभ याच्यावर बी. एन. एस कलम 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सौरभ पाटील याला अटक केली आहे. त्याला माढा न्यायालयात उभे केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास मपोसई सारिका गटकूळ या करीत आहेत.
सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या सुनेने केली सासूची हत्या अन् बुलेटवरून झाली फरार…
पुणे! पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा; अनैतिक संबध…
शिक्षिकेने ओढलं विद्यार्थिनीच्या वडिलांना प्रेमाच्या जाळ्यात अन् स्वतःच अडकली…
मोबाईलवरून अल्पवयीन मुलाने महिलेच्या डोक्यात दगड घालून केला खून…
पुणे! माजी नगरसेविकेच्या मुलाने आळंदीला नेऊन केलं लग्न अन् तीनवेळा गर्भपात…
चालकासोबत मालकीणीचं प्रेमसंबंध; महिलेच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट…

