
हृदयद्रावक! सुट्टीवर आलेल्या जवानावर काळाने घातला घाला…
पाचोरा (जळगाव) : गावाला नवीन घर बांधल्यानंतर घराची वास्तुशांतीच्या कार्यक्रमसाठी भारतीय सीमा सुरक्षा दलात कार्यरत जवान भूषण आनंदराव बोरसे सुटीवर आले होते. शेतात गेलेल्या वडिलांना मदतीसाठी गेले असताना त्यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली गाव शिवारात घडली.
अंतुर्ली खडकी गावचे सुपुत्र भुषण आनंदराव बोरसे हे बिहार येथील मोतीहारी ७टि १बीएन बटालीय मध्ये सशस्त्र सिमा बलमध्ये कार्यरत होते. पाचोरा शहरातील नवीन कॉलेज मागील परिसरात त्यांनी घेतलेल्या नवीन घराची वास्तुशांतीचा कार्यक्रम नियोजित केला होता. यासाठी ते रजा घेऊन घरी आले होते. या दरम्यान ते दिवसभर परिवारासह पेडकाई माता या कुलस्वामिनीचे दर्शन घेऊन आपल्या गावी आले.
दरम्यान, अचानक पावसाची रीमझीम सुरू झाली. तेव्हा हातातील घड्याळ आणि मोबाईल विजेपासुन सुरक्षेच्या दृष्टीने घरी ठेवले. यानंतर ते दुचाकीने शेतात गेलेल्या वडीलांना मदतीसाठी गेले होते. यावेळी विजेचा कडकडाट सुरू होता. वीज कोसळून वडीलांपासून अवघ्या १०० फुट अंतरावर असलेल्या भुषण बोरसे यांच्या अंगावर पडली आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
जवान चंदू चव्हाण यांचे धुळ्यात भीक मागो आंदोलन; गळ्यात पाटी, पाटीवर स्कॅनर…
Video: जवानाचा मृतदेह मिळाला तब्बल ५६ वर्षांनी…
कोल्हापुरातील जवानाची अखेर मृत्यूशी झुंज संपली; पत्नी, प्रियकरावर गुन्हा दाखल…
हुतात्मा जवानाच्या वडिलांचे आरोप; सून सगळं घेऊन गेली…
Video: हिमवर्षावात छत्रपती शिवाजी महाराजांना जवानांकडू अनोखी मानवंदना!

