
पालघर दुर्घटनेतील ‘त्या’ गूढ रात्रीचा थरार; तिघांचा मृत्यू…
पालघर : पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकात मालगाडी खाली येऊन तीन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना समोर आल्यानंतर मृत तरुणांच्या कुटुंबियांनी अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित करत संपात व्यक्त केला आहे.
पालघर रेल्वे स्थानकाजवळी जैन मंदिरातजवळ ही घटना घडली. घडलेल्या या दुर्घटनेत स्वप्नील पालांडे (वय २३), कुणाल कुमार दुबळा (वय २३) आणि अफरोज खलील शेख (वय २८) या तीन युवकांचा दुर्देवी मृ्त्यू झालेला असून तिन्ही युवक हे पालघरच्या वीरेंद्र नगर येथील रहिवाशी असल्याची माहिती समोर आलेली आहे.

घटनेच्या रात्री हे तरुण रेल्वे परिसरात बसले होते. त्या दरम्यान काही पोलिस सिव्हिल कपड्यांमध्ये तेथे आले आणि युवकांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली, असा आरोप मृत तरुणांच्या कुटुंबियांनी केला आहे. मात्र त्याच दरम्यान सुरु असलेल्या गोंधळात तरुण रेल्वे रुळावरुन पळू लागले आणि रुळावर वेगाने येणाऱ्या मालगाडीची युवकांना धडक बसली यावेळी तिघांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी कुटुंबियांना दिलेल्या माहितीनुसार, तिघा तरुणांनी मालगाडीसमोर येऊन आपले जीवन संपवले असल्याचा दावा करण्यात आला. मात्र पोलिसांचा हा दावा कुटुंबियांनी फेटाळून लावला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
हनी ट्रॅप! श्रीमंतांना लक्ष्य करून लॉजवर बोलवायची अन् बाथरूममध्ये जाताच…
ओळखीच्या महिलेनं वृद्धाला कारमध्ये बसवलं अन् घरी नेत केलं मोठं कांड…
नाशिक! पत्नी अन् प्रियकराने गोड बोलून संपवलं; अखेर गूढ समोर…
हृदयद्रावक! डॉ. स्तुती सोनवणे यांनी लिहिलेली सुसाईड नोटमध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख…

