आरोपीने धावत्या रेल्वेतून उडी मारली अन् पुढच्याच क्षणात…

मुंबईः एका अटक केलेल्या आरोपीनं पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यासाठी थेट धावत्या रेल्वेतून उडी मारली अन् पुढच्याच क्षणात त्याचा मृत्यू झाला आहे. कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. प्रकाश राय असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे.

आरोपी गुजरातच्या सुरतमध्ये मागील अनेक दिवसांपासून लपून बसला होता. त्याला अटक करून रेल्वेने घेऊन जात असताना त्याने धावत्या रेल्वेतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना रायगड जिल्ह्यातील बदलापूर ते वांगणी दरम्यान ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.

आरोपी मुळचा तेलंगणा राज्यातील हैदराबाद जवळच्या एका गावातील रहिवासी आहे. त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि फसवणूक असा गून्हा दाखल आहे. हा गुन्हा दाखल झाल्यावर तो फरार झाला होता. त्याचा शोध तेलंगणा पोलीस घेत होते. दरम्यान, तो गुजरातच्या सुरतमध्ये असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तेलंगणा पोलिसांनी गुजरात राज्यातील सूरत येथून त्याला अटक केली. अटकेनंतर आरोपी प्रकाश राय यास हैदराबाद येथे घेवून जाण्याकरिता राजकोट-सिकंदराबाद एक्सप्रेस ट्रेन मधून सुरत पासून त्यांनी प्रवासास सुरवात केली होती. रेल्वे सोमवारी रायगड जिल्ह्यात बदलापूर ते वांगणी दरम्यान जात असताना आरोपी प्रकाश राय याने बाथरूमला जाण्याची परवानगी तेलंगणा पोलीसांकडे मागितली. त्यामुळे त्याच्या हातामधील हातकडी पोलीसांनी काढली. हातकडी काढताच हात धुण्याचा बहाणा केला आणि आरोपी प्रकाश राय याने धावत्या ट्रेनमधून बाहेर उडी मारली व त्यांत तो जागीच मृत झाला. पोलिस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केलेल्या युवकाची आत्महत्या…

PSI गोपाळ बदने पोलिस खात्यातून बडतर्फ…

पुणे! विद्येच्या माहेरघरात भोंदबाबाचा प्रताप; इंजिनिअर पती अन् शिक्षिका पत्नीला फसवलं…

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील लाचखोर उपनिरीक्षकाच्या घरात मिळालं घबाड…

Video: गणेश काळे याचा पाठलाग केला अन् चार गोळ्या झाडल्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!