
मुंबईत रेल्वे अपघात! पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमधून प्रवासी ट्रॅकवर पडले, 5 जणांचा मृत्यू…
मुंबईः मध्य रेल्वेमार्गावरून आज (सोमवार) सकाळी पुष्पक एक्स्प्रेस (Pushpak Express Train Accident) कसाऱ्याच्या दिशेने जात असताना या गाडीतून 5 प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले. या प्रवाशांना तातडीने रुग्णावाहिका आणून कळव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र या पाचही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मध्य रेल्वेच्या दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होते. त्यामुळे हे प्रवासी दारात लटकले होते.
सदर अपघाताचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओत पुष्पक ट्रेनमधून खाली पडलेल्या प्रवाशी दिसत आहेत. या प्रवाशांना ट्रॅकवरुन उचलून प्लॅटफॉर्मवर आणण्यात आले. या प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. अनेकांना गंभीर दुखापत झाली असून यापैकी काही प्रवाशांना मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. दिवा ते कोपर स्थानकांदरम्यान हे प्रवासी चालत्या ट्रेनमधून खाली पडले. मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
पाच प्रवासी मुंब्रा स्थानकाजवळ रेल्वेतून खाली पडले. कसाऱ्याला जाणाऱ्या रेल्वेच्या गार्डने याबाबतची माहिती दिली. नेमक्या कोणत्या गाडीतून प्रवासी खाली पडले, याबाबत अद्याप माहिती नाही, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी दिली.
दरम्यान, दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान पाच जण एक्स्प्रेसमधून पडले. या पाचही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अॅम्ब्युलन्समधून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. पुष्पक एक्स्प्रेस मुंबई ते लखनौदरम्यान धावते. सीएसएमटीवरुन सकाळी 8.25 वाजता पुष्पक एक्स्प्रेस निघाली होती. पुष्पक एक्स्प्रेसचा पुढचा थांबा कल्याण रेल्वे स्थानक होता. मात्र, दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान आल्यावर हे प्रवासी रेल्वेतून पडले.
दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी; कुंभस्नानासाठी जाणाऱ्या प्रवाशांचा मृत्यू…
मुंबईत प्रेमी युगलाने घेतली रेल्वे एक्सप्रेससमोर उडी…
जळगाव रेल्वे अपघातात ११ जणांचा मृत्यू; केवळ अफवा ठरले कारण…
Video: मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी; पाहा जखमींची नावे…
मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनवर पोलिसांची चाणाक्ष नजर गेली एका बॅगवर अन्…

