भारती विद्यापीठ पोलिसांनी सराईत वाहन चोरास शिताफीने केली अटक…
पुणे (संदीप कद्रे): भारती विद्यापीठ पोलिसांची कौशल्यपूर्ण कामगिरी करत सराईत वाहन चोरास शिताफीने अटक करुन त्याच्याकडून चोरीची ५ दुचाकी वाहने जप्त केली आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. भारती विदयापीठ पोलिस स्टेशन हद्दीत वाहन चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व पोलिस अंमलदार हे […]
अधिक वाचा...पोलिस उप आयुक्त स्मार्तना पाटील यांनी पाच गुन्हेगारांना केले हद्दपार; पाहा नावे…
पुणे (संदीप कद्रे): पोलिस उप आयुक्त स्मार्तना पाटील यांनी गुन्हेगार पार्श्वभुमी असलेल्या ०५ गुन्हेगारास हद्दपार केले आहे. पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ०२ मधील पोलिस स्टेशनचे गुन्हे अभिलेखावर खुन करणे, खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी, दरोडा, दरोडयाची तयारी करणे, जबरी चोरी करणे, बलात्कार, विनयभंग, बाल लैगिंक अत्याचार करणे, पुरावा नष्ट करणे, गंभीर दुखापत करणे, दहशत माजवणे, बेकायदेशीर […]
अधिक वाचा...बेल्हे-जेजुरी महामार्गावर भीषण अपघातात एकूलता एक मुलगा गमावला…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): बेल्हे-जेजुरी महामार्गावर असलेल्या लाखनगावात मोटारीला झालेल्या भीषण अपघातामध्ये एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भरधाव अल्टो कारने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला. रसिक रंगनाथ दौंड (वय 19 रा. लाखनगाव, ता. आंबेगाव, जि.पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव […]
अधिक वाचा...पुणे शहरात दहीहंडी रात्री 10 वाजेपर्यंत: पोलिस
पुणे : पुणे शहरात दहीहंडी उत्सव रात्री 10 वाजेपर्यंतच साजरा करता येणार आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालय आणि राज्य सरकारच्या आदेशाचे पालन करण्यात येईल, असे पुणे शहर पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पुणे शहरातील काही सार्वजनिक मंडळांनी याआधी दहीहंडी उत्सवाला रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देण्याची मागणी केली होती. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रात्री 10 ते सकाळी 6 […]
अधिक वाचा...लोणीकंद पोलिसांनी वेशांतर करून पीएमपीएल बसमध्ये चोरी करणाऱ्यास पकडले…
पुणे (संदीप कद्रे): लोणीकंद पोलिसांनी टेहाळणी करुन पीएमपीएल बसेसमध्ये चोरी करणाऱ्या महिलेस अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पीएमपीएलच्या बसेस मध्ये गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या पर्स मधुन चोरी मोबाईल चोरी, पाकिट मारी असे प्रकार सुरु झाल्याची माहिती लोणीकंद पोलिसांना मिळाली होती. त्या अनुशंगाने नागरीकांच्या मुल्यवान वस्तूंचे संरक्षण व्हावे व या घटनांना प्रभावी […]
अधिक वाचा...रांजणगाव MIDC पोलिसांनी शेतीपंप चोरी करणाऱयांना केली अटक…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कारेगाव-फलकेमळा येथील मोबाईल टॉवरच्या 46 बॅटऱ्यांच्या चोरी प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध रांजणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात होता. खंडाळे, वाघाळे, गणेगाव खालसा, भांबार्डे व रांजणगाव इत्यादी ठिकाणी इलेक्ट्रीक रोहीत्र चोरीचे सत्र मागील काही महिन्यापासुन चालू होते. तसेच खंडाळे येथील शेतक-यांच्या शेतीपंप मोटारी चोरीच्या प्रमाणात वाढ झाली […]
अधिक वाचा...गौतमी पाटील हिच्या वडिलांचे उपचारादरम्यान निधन…
पुणे : नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या वडिलांचे उपचारादरम्यान आज (सोमवार) निधन झाले. रवींद्र बाबुराव पाटील असे गौतमी पाटील हिच्या वडिलांचे नाव आहे. गौतमी पाटील हिचे वडील रवींद्र पाटील हे धुळ्यात बेवारस स्थितीत आढळले होते. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते. त्यानंतर गौतमी पाटील हिने वडिलांची जबाबदारी घेत त्यांना उपचारासाठी पुण्यात […]
अधिक वाचा...राठी हत्याकांडातील मुख्य आरोपीने काढले २८ वर्षे कारागृहात; पुन्हा केला गुन्हा…
पुणे (महेश बुलाख): तब्बल २८ वर्षे तुरुंगात काढणाऱ्या व पुणे शहराला हादरविणाऱ्या राठी हत्याकांडातील मुख्य आरोपीस अफीमच्या तस्करी प्रकरणी वाकड पोलिसांनी अटक केली आहे. शिवाय, त्याच्या ताब्यातून ८९८ ग्रॅम अफीम जप्त केले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. वाकड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी त्यांचे अधिनस्थ असलेल्या तपास पथकाकील सपोनि संतोष पाटील, […]
अधिक वाचा...येरवडा तपास पथकाने चोरी करणाऱ्यास २४ तासात केले जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): घरामध्ये चोरी करणाऱ्या आरोपीस येरवडा तपास पथकाने २४ तासात जेरबंद केले आहे. येरवडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. येरवडा भागात ३१/०८/२०२३ रोजी पहाटेचे सुमारास फिर्यादी रात्रीचे वेळी घरामध्ये झोपलेले असताना कोणीतरी अज्ञात आरोपीने घराचे दरवाजाची कडी उचकटून आतमध्ये प्रवेश करुन घरातील ९८५० रुपये […]
अधिक वाचा...लष्करी अधिकारी म्हणून वावरणारा पुणे रेल्वे स्थानकावर जेरबंद…
पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर लष्करी अधिकारी म्हणून वावरत असलेल्या युवकाला पकडण्यात आले आहे. लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला तो सुरक्षा पासशिवाय प्रवेश करून सहभागी झाला होता आणि लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्याने फोटोही काढल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. भारतीय लष्कराच्या मिलिटरी इंटेलिजन्स (MI) दक्षिण कमांडकडून मिळालेल्या माहितीवरून, नीरज विक्रम विश्वकर्मा (वय 20, रा. उत्तर प्रदेश) […]
अधिक वाचा...
