मैत्रीच्या नात्याला काळीमा; घरात घुसले अन् मित्राच्या पत्नीवर केला सामूहिक अत्याचार…

मुंबई : विरार परिसरातून मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. दोघांनी आपल्या मित्राच्याच पत्नीवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पती घरी नसताना आरोपींनी अचानक घरात शिरून तिच्यावर अत्याचार केला. यावेळी आरोपींनी पीडितेच्या चार वर्षाच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही पीडितेनं केला आहे. या प्रकरणी विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूरज यादव आणि विशाल असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सामूहिक अत्याचारासह जीवे मारण्याची धमकी आणि इतर गंभीर कलमांतर्गत हा गुन्हा नोंदवला आहे. हा गुन्हा नोंदवताच अवघ्या काही तासात पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

मुख्य आरोपी सूरज यादव हा पीडित महिलेच्या पतीचा मित्र आहे. गेल्या पाच वर्षांपासून पीडित महिला आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते. ८ तारखेला महिलेचा पती घरी नसताना सूरज यादव हा विशाल नावाच्या आपल्या अन्य एका मित्रासोबत महिलेच्या घरी गेला. यावेळी पीडितेच्या चार वर्षांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत दोघांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. या घटनेनंतर पीडितेने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनंतर विरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून सूरज यादव आणि विशाल या दोघांना अटक केली. या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास विरार पोलिस करत आहेत.

महाराष्ट्राला हादरला! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर लॉजवर सामूहिक अत्याचार…

राजधानी हादरली! मित्राला पकडले अन् मुलीवर सामूहिक बलात्कार…

जळगाव! ट्रॅक्टर मालकासह चौघांनी शेतात केला सामूहिक अत्याचार…

पुणे! आळंदी परिसरात घरात घुसून सामूहिक लैंगिक अत्याचार…

महिला पोलिस कॉन्स्टेबलवर सलग 8 वर्ष सामूहिक बलात्कार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!