राठी हत्याकांडातील मुख्य आरोपीने काढले २८ वर्षे कारागृहात; पुन्हा केला गुन्हा…

पुणे (महेश बुलाख): तब्बल २८ वर्षे तुरुंगात काढणाऱ्या व पुणे शहराला हादरविणाऱ्या राठी हत्याकांडातील मुख्य आरोपीस अफीमच्या तस्करी प्रकरणी वाकड पोलिसांनी अटक केली आहे. शिवाय, त्याच्या ताब्यातून ८९८ ग्रॅम अफीम जप्त केले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

वाकड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी त्यांचे अधिनस्थ असलेल्या तपास पथकाकील सपोनि संतोष पाटील, पोउपनि. सचिन चव्हाण यांना सोबतचे पोलिस अंमलदार यांना पारंपारीक व तांत्रीक तपासाद्वारे अंमली पदार्थांची तस्करी करणारे लोकांचा शोध घेवून त्यांना अटक करुन अंमली पदार्थ जप्त करणेबाबत सुचना दिल्या आहेत. तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आप-आपले विश्वासु बातमीदारामार्फत पिंपरी चिंचवड मध्ये होणा-या अंमली पदार्थाचे तस्करीबाबत माहीती काढणेचे काम सुरु केले. त्यासाठी अंमली पदार्थाच्या गुन्हयातील रेकॉर्डवरील आरोपी चेक करुन त्यांचेकडुन माहीती काढणेचे काम सुरु केले.

सपोनि. संतोष पाटील व त्यांचे सोबतचे पोलिस अंमलदार हे ०२/०९/२०२३ रोजी हद्दीत पेट्रोलींग करीत होते. मुंबई पुणे हायवे लगत सिल्व्हर जिमकडे जाणारे रोडचे कोप-यावर वाकड पुणे येथे एक जण गडबडलेल्या अवस्थेत उभा असलेला दिसला. त्याच्या हातात पांढऱ्या रंगाची पिशवी दिसली व पोलिसांना पाहून पळून जाणेचे स्थितीत दिसल्याने त्याचे हालचालींबाबत शंका आली. त्यास ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचे ताब्यातील पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये अफीम हा अंमली पदार्थ असल्याचे दिसून आले. त्यास ताब्यात घेवून नाव पत्ता विचारला असता त्याने स्वतःचे नाव नारायण चेतनराम चौधरी (वय ४१, रा. जालबसर, बिकानेर, राजस्थान) असे सांगीतले. त्याच्या ताब्यात मिळुन आलेल्या पदार्थाची अंमली पदार्थ तपासणी किट द्वारे तपासणी केली असता तो पदार्थ अफीम असल्याचे निष्पन्न झालेने कायदेशीर पंचनामा करुन एकुण ८९८ ग्रॅम वजनाचा अफीम हा अंमली पदार्थ जप्त करणेत आला आहे.

सदर अफीमची बाजारात ४०० /- रु प्रति ग्रॅम अशी असून जप्त मालाची एकूण किंमत ३,५९,२००/- रुपये एवढी आहे. आरोपीस माल कोणाकडून आणला याबाबत चौकशी केली असता त्याने सुगनाराम (रा. उदरासर बिकानेर राजस्थान) याचा माल असलेबाबत सांगीतले. सदरबाबत वाकड पोलिस स्टेशन गु.रजि. नं. ८६९/ २०२३ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), १७(ख) व २९ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला आहे. आरोपी नारायण चौधरी याचेकडे तपास केला असता धक्कादायक माहीती समोर आली की, त्याने व त्याचे साथीदारांनी मिळून २६ ऑगस्ट १९९४ मध्ये पौड रोड, कोथरुड पुणे परीसरात राहणारे एकाच कुटुंबातील ०७ सदस्यांची लुटमार करणेचे उद्देशाने निघृणपणे हत्या केली होती. त्याबाबत कोथरुड पोलिस स्टेशन गु.रजि. नं. २१८/१९९४ भादविक ३०२, ३४२, १२० (ब), ३९२, २९७,४४९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. आरोपीस ०५/०९/१९९४ रोजी राजस्थान येथून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आरोपी व त्याचे साथीदार यांना १९९८ मध्ये फाशीची शिक्षा झाली होती. सदर आरोपी मागील २८ वर्षापासून महाराष्ट्रातील वेगवेगळया जेल मध्ये वास्तव्यास होता.

२७ मार्च २०२३ मध्ये सुप्रिम कोर्ट, दिल्ली यांनी आरोपी नारायण चौधरी यास तो गुन्हयाचेवेळी विधीसंघर्षीत असल्याकारणाने त्याची फाशीची शिक्षा रद्द करुन त्यास मुक्त केले होते. सदरचा आरोपी जेल मधुन बाहेर आले नंतर त्याचे मुळगावी राजस्थान येथे गेला होता. तेथे त्याची ओळख सुगनाराम रा. उदरासर बिकानेर राजस्थान याचे सोबत झाली त्याचे सांगणे वरुन तो पुणे येथे अफीम या अंमली पदार्थाची तस्करी करणेकरीता आला होता. नारायण चेतनराम चौधरी यास गुन्हयात अटक करण्याच आली असून त्याची ०६/०९/२०२३ रोजी पर्यत पोलिस कोठडी रिमांड प्राप्त झाला आहे.

संबंधित कारवाई पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, डॉ. संजय शिंदे, सह. पोलिस आयुक्त, वसंत परदेशी, अपर पोलिस आयुक्त, डॉ. काकासाहेब डोळे, पोलिस उप आयुक्त, परि २ पिंपरी चिंचवड, डॉ. विशाल हिरे, सहा. पोलिस आयुक्त साो, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली गणेश जवादवाड वरिष्ठ पोलिस निरीक्षक, रामचंद्र घाडगे पोलिस निरीक्षक (गुन्हे), सपोनि. संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण, सपोफौ. बाबाजान इनामदार, सपोफौ. राजेंद्र काळे, पोहवा. स्वप्निल खेतले, पोहवा. वंदु गिरे, पोहवा. संदीप गवारी, पोहवा. दिपक साबळे, पोहवा. प्रमोद कदम, पोहवा. अतिश जाधव, पोना. अतिक शेख, पोना. प्रशांत गिलबीले, पोशि. भास्कर भारती, पोशि सौदागर लामतुरे, पोशि. स्वप्निल लोखंडे, पोशि. विनायक घारगे, पोशि. कौंतेय खराडे, पोशि सागर पंडीत (परि – ०२ कार्यालय) यांनी मिळून केली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींना घेतले ताब्यात…

पिंपरी-चिंचवडमध्ये फिल्मी स्टाईलने भरदिवसा खून; दोघांना अटक…

पिंपरी-चिंचवडमधील पोलिसकाकांचे अपघाती निधन…

पिंपरी-चिंचवड परिसरात कोयत्याचा धाक दाखवून चोरी करणारी टोळी जेरबंद…

पिंपरी-चिंचवड हद्दीत दुचाकी चोरी व घरफोडीचे गुन्हे उघड…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!