भारती विद्यापीठ पोलिसांनी सराईत वाहन चोरास शिताफीने केली अटक…

पुणे (संदीप कद्रे): भारती विद्यापीठ पोलिसांची कौशल्यपूर्ण कामगिरी करत सराईत वाहन चोरास शिताफीने अटक करुन त्याच्याकडून चोरीची ५ दुचाकी वाहने जप्त केली आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

भारती विदयापीठ पोलिस स्टेशन हद्दीत वाहन चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व पोलिस अंमलदार हे पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत होते. पोलिस अंमलदार धनाजी धोत्रे, हर्षल शिंदे, सचिन गाडे, यांना त्यांचे बातमीदारामार्फेतीने बातमी मिळाली की रेकॉर्डवरील वाहन चोर कुणाल सुरेश बधे (वय २९ वर्षे, धंदा वायरमन, रा. मु.पो रांजणे, ता. वेल्हा, जि. पुणे) हा अमृत खान, लिपाणे वस्ती येथे चोरीची दुचाकी गाडी घेवून थांबला आहे, अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे अमृत खान लिपाणे वस्ती गेले. आरोपी दुचाकी गाडी MH12BT1538 हिच्यासह मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवुन तपास करता त्याने सदरची गाडी चोरी केल्याची कबुली दिली. गाडीबाबत भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन गुन्हा रजि नंबर ५६५ / २०२३ भादंवि कलम ३७९ या गुन्हयातील चोरीस गेले असल्याची निष्पन्न झाले आहे. त्याच्या ताब्यातील दुचाकी गाडी MH12BT1538 ही जप्त करुन त्यास नमुद गुन्ह्यात अटक केली आहे.

आरोपी कुणाल सुरेश बघे (वय २९ वर्षे, धंदा वायरमन, रा. मु.पो रांजणे, ता. वेल्हा, जि. पुणे) याच्याकडे अटके दरम्यान तपास केला असता त्याचेकडून एकुण ५ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. आरोपीकडून खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.
१. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन गुरंनं ५६५ / २०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे
२. कोंढवा पोलिस स्टेशन गुन्हा रजि ६४३/२०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे
३. कोंढवा पोलिस स्टेशन गुन्हा रजि ३५०/२०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे
वरील प्रमाणे आरोपीताकडुन एकुण ३,००,०००/- रुपयांची ५ दुचाकी वाहने जप्त करुन ३ दुचाकी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीकडून जप्त केले आणखीन दोन गाडयांबाबत माहीती घेण्याचे कामकाज चालू आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, संदीप कर्णिक, सह आयुक्त, पुणे शहर, प्रविणकुमार पाटील, अपर पोलिस आयुकत पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, स्मार्तना पाटील पोलिस उप आयुक्त परिमंडळ २, नारायण शिरगावकर, सहाय्यक पोलिस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलिस स्टेशनकडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड तसेच पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ, पोलिस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलिस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे, हर्षल शिंदे, सचिन सरपाले, चेतन गोरे, शैलेश साठे, महेश बारावकर, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, अवधतु जमदाडे, अभिजीत जाधव, निलेश खैरमोडे, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; रात्रीत 159 गुन्हेगारांना अटक…

लष्करी अधिकारी म्हणून वावरणारा पुणे रेल्वे स्थानकावर जेरबंद…

पुणे शहरात अट्टल घरफोडी चोराकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त…

समृद्धी महामार्ग एक Live अनुभव अन् बरंच काही…

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!