बेल्हे-जेजुरी महामार्गावर भीषण अपघातात एकूलता एक मुलगा गमावला…

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): बेल्हे-जेजुरी महामार्गावर असलेल्या लाखनगावात मोटारीला झालेल्या भीषण अपघातामध्ये एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भरधाव अल्टो कारने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला.

रसिक रंगनाथ दौंड (वय 19 रा. लाखनगाव, ता. आंबेगाव, जि.पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बेल्हे-जेजुरी महामार्गावर चारचाकीने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये रसिक रंगनाथ दौंड या कुटुंबातल्या एकूलत्या एक मुलाचा मृत्यू झाला आहे. रसिक दौंड हा बेल्हे जेजुरी महामार्गावरून घरी जात असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव अल्टो कारने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातामध्ये रसिक याचा जागीच मृत्यू झाला.

दत्तात्रय राजाराम दौंड (वय 63, रा. लाखनगाव दौंड वस्ती ता. आंबेगाव जि. पुणे) यांनी पारगाव (का) पोलिस स्टेशन मध्ये याबाबतची तक्रार दिली आहे. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास लाखनगावच्या हद्दीत चारंगबाबा गायरानासमोर अल्टो कार के 10 गाडी नंबर एम. एच.10 के.एस. 8087 व मोटर सायकल नंबर एम. एच 14 सी क्यू 9831 अल्टो गाडी चालक ही लोणी बाजूकडे जात असताना समोर चाललेल्या मोटरसायकला पाठीमागच्या बाजूने धडक देऊन तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत झाला. हात व पायास डोक्यास गंभीर जखमा झाल्यामुळे युवक रसिक रंगनाथ दौंड याचा मृत्यू झाला. वाहन चालक सागर भिमाजी साळवे (राहणार साकुर मांडवा, ता. संगमनेर, जि अहमदनगर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पारगाव कारखाना पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सांगडे करत आहेत.

शिक्षक पती-पत्नीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; मुलगा गंभीर…

Video: रायगडमधील भीषण अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद…

लातूरमध्ये भीषण अपघातात न्यायाधीशांचा जागीच मृत्यू…

बहिणीच्या वाढदिवसाला जाताना दुचाकीला अपघात; महिलेचा मृत्यू…

दिशा भोईटे हिच्या मृत्यूबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन; चौकशीची मागणी…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!