पुणे दहशतवादी अटक प्रकरणात मोठी घडामोड; वाहनात आढळला शस्त्रसाठा…
पुणे : महाराष्ट्र एटीएसने दहशतवादाचा मोठा कट उधळला असून, पुण्यामधील दहशतवादी कारवाईला आळा घालण्यात एटीएसला यश आले आहे. पुणे कोंढवा परिसरात राहणारे ISIS या दहशतवादी संघटनेचे मॉड्युल महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाकडून उध्वस्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र एटीएसने दहशदवादी संघटनेशी संबंधित अटक आरोपीकडून एक चारचाकी वाहन आणि दोन अग्निशस्त्रे तसेच पाच जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. घरी कोणाच्या हाती लागू नये, म्हणून या दोघांनी पिस्टल आणि काडतुसं या गाडीत लपवून ठेवल्याची माहिती समोर आली आहे.
अटक आरोपी आणि फरार साथीदार आरोपी यांनी पुणे आणि इतर ठिकाणी रेकी करण्यासाठी वापरलेले एक दुचाकी वाहनही महाराष्ट्र एटीएसने जप्त केले आहे. मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान (वय 23) आणि मोहम्मद यूनुस मोहम्मद याकूब साकी (वय 24) या दोन्ही आणि त्यांचा पळून गेलेला साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याता आला होता. हे आरोपी मध्य प्रदेशातील रतलामचे रहिवासी आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाकडून पुढील तपास सुरु झाला.
पोलिस कोठडीतील आरोपीकडे केलेल्या तपासात तसेच त्यांचकडील इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेसमध्ये मिळून आलेल्या माहितीच्या आधारे त्यांचे ISIS या दहशतवादी संघटनेचे कनेक्शन तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी खान आणि साकी या दोघांनी जंगल परिसराची रेकी केली. तसेच तेथे ते काही दिवस लपून होते. आपले अस्तित्व लपवण्यासाठी त्यांनी जंगलात काही दिवस वास्तव्य केले होतं. तेथून ड्रोनद्वारे रेकी केली होती. आरोपीनी जंगल परिसरात वास्तव्य करण्यासाठी टेन्ट वापरले होते. ते टेन्ट आणि इतर साहीत्यही एटीएसने जप्त केले आहे.
आरोपींनी त्यांच्या साथीदारांकरता बॉम्ब बनविण्याचं शिबीर (Workshop) आयोजित केले होते. आरोपीकडून बॉम्ब बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यामध्ये केमिकल्स, केमिकल पावडर, लॅब इक्युपमेन्टस त्यामध्ये थर्मामिटर, पिपेट असे साहीत्य जप्त करण्यात आले आहे. बॉम्ब तसेच प्रशिक्षण शिबीर आयोजित करून ज्या ठिकाणी बॉम्बचे साहित्य पुरुन ठेवले होते. त्या ठिकाणाहून केमिकल्स आणि केमिकल्स पावडरसह इतर साहित्या एटीएसने हस्तगत केले आहे. महाराष्ट्र एटीएसने आतापर्यंत या प्रकरणात पाच आरोपींना अटक केली आहे.
एनआयए आणि एटीएस या दोन वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी उद्ध्वस्त केलेली पुण्याच्या कोंढवा भागातील दहशतवाद्यांची मोड्युल्स एकमेकांच्या संपर्कात होती आणि एकमेकांना मदतही करत होती, हे आता स्पष्ट झाले आहे. एनआयएने अटक केलेला झुल्फीकार अली बरोडावाला हा एटीएसने अटक केलेल्या मोहम्मद युसुफ खान आणि मोहम्मद युनुस साकी या दोघांना पैसै पुरवत असल्याच स्पष्ट झाले आहे. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसने बरोडावालाचा एनआयएच्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या बरोडावालाचा ताबा घेऊन त्याची चौकशी सुरु केली.
पुणे दहशतवादी प्रकरण : भूलतज्ञ डॉक्टर युवकांना ओढायचा ISISच्या जाळ्यात अन्…
दहशतवाद्यांच्या घरात सापडली बॉम्ब बनविण्याबाबतची चिठ्ठी…
पुण्यातील संशयित दहशवादी प्रकरणात आणखी एक ताब्यात; युवती रडारवर…
पुण्यात स्फोट करण्याचा कट; तिसऱ्या आरोपीला गोंदियातून अटक…
पुण्यात सापडलेल्या दहशतवाद्यांबाबत एटीएसची धक्कादायक माहिती…