‘कॉल गर्ल’च्या नावाने फोन करून युवकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला बेड्या…

पुणे (संदिप कद्रे) : गुगलवर कॉलगर्लच्या नावाने खोटे मोबाईल नंबर अपलोडकरून युवकांची फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. कॉलगर्लच्या नावाने युवकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुगलवर कॉलगर्लचे खोटे मोबाईल नंबर अपलोड करून ही टोळी तरुणांची फसवणूक करत होती. 40 सीम, 14 डेबिट कार्डसह टोळीला बेड्या ठोकल्या आहेत.

गुगलवर कॉलगर्लच्या नावाने खोटे मोबाईल नंबर अपलोड करुन ऑनलाईन खंडणी मागणा-या टोळीला कोलकता, पश्चिम बंगाल येथील कॉल सेंटर उध्वस्त करुन ते चालवणाऱ्या ०६ आरोपींना अटक करुन त्यांच्या कडून ४,८४,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. दिघी पोलिस ठाणे येथे फिर्यादी सौरभ शरद विरकर (वय २६ वर्षे, व्यवसाय नोकरी) यांनी फिर्याद दिली कि, १५/०५/२०२४ रोजी रात्री ०९.३० वा सुमारास फलॅट नं १००१ / डी २, स्टेला सोसायटी, डुडूळगाव, ता हवेली जि पुणे येथे त्यांचा मावस भाऊ किरण नामदेव दातिर (वय ३५) याने ऑनलाईन पैसे मागीतल्याचे कारणावरुन राहते घराचे हॉलमध्ये पंख्याला ओढणीचे सहायाने गळफास घेवुन आत्महत्या केली आहे. सुरजकुमार व त्याचे साथिदार मोबाईल क्रं. ९३३०६९९३७९, ९२२९३७१७८७, ९१४२८६०११५, ९००७७२७४१०, ७०४४१५७४९९ यांनी मयत किरण नामदेव दातिर याचे मोबाईलवर संपर्क करून त्यांचा व्हॉटसअॅपचा डीपी काढून त्याचे फोटोची छेडछाड करून त्याचाच फोटो चित्रविचित्र अवस्थेत बनवून त्यालाच व्हॉटसअप करून त्यांला वारंवार कॉल करून पैसे मागितले व १२,०००/- रुपये बँकखात्यावर स्विकारून पुन्हा वेगवेगळया फोन वरून कॉल करून त्याला ब्लॅकमेल करून पुन्हा त्याचेकडे ५१ लाख रू दे नाहीतर हे सर्व फोटो गुगलवर टाकुन बदनामी करण्याची धमकी दिली होती. ५१ लाख रूपयांची खंडणी मागुन किरण दातीर यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले म्हणुन दिघी पोलिस ठाणे येथे गुरक्रं. २३९/२०२४ भा. द. वि कलम ३६०, ३८५, ३४ सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६७(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

policekaka-special-offer
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आरोपी अटक करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. तसेच सदर बाबत खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा यांचा समांतर तपास चालू होता. तपासी अधिकारी वपोनी विजय ढमाळ दिघी पोलिस ठाणे व वपोनी संतोष पाटील खंडणी विरोधी पथक यांचे मार्गदर्शनखाली पाहिजे आरोपी वापरत असलेले मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण दिघी पोलिस ठाणे तपास पथकाचे सपोनीनितीन अंभोरे, पोहवा १०२० किशोर कांबळे व खंडणीविरोधी पथकाचे पोउनी सुनिल भदाणे, पोहवा १३९२ सुनिल कानगुडे, पोहवा ८८१ प्रदिप गोडांबे यांनी करुन आरोपी निश्पन्न केले. ०७/०६/२०२४ रोजी वरनमुद पथक आरोपी यांचा शोध घेण्यासाठी रवाना होवुन आरोपी यांचे मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण करुन आरोपी नगेर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोलकाता येथे असल्याचे निश्पन्न केले तसेच त्या परीसरात सर्च घेवुन फ्लॅट नं ४/बी चवथा माळा, उदयान सोसायटी नया पट्टी रोड दुर्गाबती कॉलनी, डायमंड प्लाझा जवळ कोलकाता पश्चिम बंगाल येथे छापा टाकुन फ्लॅट मधुन खालील सहा आरोपी अटक करण्यात आले आहेत.

१) सुरजकुमार जगदिश सिंग, वय २७ वर्षे,
२) नविनकुमार महेश राम वय २३ वर्षे,
३) सागर महेंद्र राम वय २३ वर्षे,
४) मुरली हिरालाल केवट, वय २४ वर्षे,
५) अमरकुमार राजेंद्र राम, वय १९ वर्षे,
६) धिरनकुमार राजकुमार पांडे, वय २५ वर्षे, सर्व रा. फ्लॅटनं ४ / बी चवथा माळा, उदयान सोसायटी नया पट्टी रोड दुर्गाबती कॉलनी, डायमंड प्लाझा जवळ कोलकाता पश्चिम बंगाल. मुळ गाव झारखंड अटक आरोपीकडुन एकुण १५ स्मार्ट मोबाईल फोन, ०७ व्हाईसचेंज मोबाईल्स, ४० सिमकार्ड, १४ पेमेंट डेबीट कार्ड, ०८ आधारकार्ड-पॅनकार्ड व ०८ नोटबुक असा एकुण ४,८४,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक आरोपी नवीन सिमकार्ड विकत घेवून जी-मेल वर बनावट नावाने खाते तयार करुन त्याच्या आधारे गुगलवर भारतातील वेगवेगळया शहरातील कॉलगर्लच्या नावाने मोबाईल नंबर अपलोड करुन त्यावर फोन आल्यावर कॉल गर्ल पुरवण्याच्या नावाखाली स्वतःच्या खात्यावर पैसे स्विकारुन बळिताचा मोबाईल नंबर प्राप्त करुन त्याचेसोबत आय-किल कंपणीच्या व्हाईसचेंज मोबाईल द्वारे महिलेच्या आवाजात बोलणी करुन त्यावरुन बळितांचे मोबाईल नंबर वरुन त्याचे सोशल मिडीया वरुन फोटो प्राप्त करुन ते फोटो चित्रविचित्र अवस्थेत बनवुन त्यालाच व्हॉटसअप करून त्यांला वारंवार कॉल करून पैश्याची मागणी करुन पैसे स्विकारत होते तसेच कुणी तक्रार करु नये म्हणून फक्त ५ ते १० हजार रुपये स्विकारत होते. नमुद गुन्हयात ०६ आरोपी अटक करण्यात आले असुन ४,८४,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
करण्यात आला आहे. आरोपी पोलिस कोठडीत असुन तपास चालू आहे.

सदरची कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, वसंत परदेशी अपर पोलिस आयुक्त, संदिप डोईफोडे, पोलिस उप-आयुक्त, गुन्हे, डॉ. शिवाजी पवार पोलिस उप-आयुक्त परीमंडळ ०३, डॉ विशाल हिरे, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हे, डॉ सचिन हिरे, सहा. पोलिस आयुक्त, भोसरी एमआयडीसी विभाग, विजय ढमाळ वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिघी पोलिस ठाणे व संतोष पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली, सपोनी नितीन अंभोरे व पोहवा किशोर कांबळे दिघी पोलिस ठाणे व पोउनी सुनिल भदाणे, पोहवा सुनिल कानगुडे, पोहवा प्रदिप गोडांबे खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा यांचे पथकाने केली आहे.

भाजप नेते समरजित घाटगे यांच्या पत्नीला कॉल आला अन् गमावले २० लाख…

पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकाला नेहाने घातला गंडा…

IPS महिला अधिकाऱ्याची फसवणूक; लग्नानंतर खरी माहिती उघड…

आयटी युवतीची लाखो रुपयांची ऑनलाइन फसवणूक; पण परत मिळाले पैसे…

महिलेला फोन आला आणि क्षणात लाखो रुपये गायब; कसे पाहा…

सायबर गुन्हेगाराने खासदाराला घातला लाखो रुपयांचा गंडा…

युवतीची फसणवूक करणाऱ्यास सायबर पोलिसांनी घातल्या बेड्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!