पुणे! चेंबरमध्ये अडकून दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू; घटनेची पुनरावृत्ती…

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरणातील लोकमान्य हॉस्पिटलजवळ एका चेंबरमध्ये अडकून दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. २६) मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर दोघांनाही चेंबरमधून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठवून दिले. कामगारांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे […]

अधिक वाचा...

पाच कोटींच्या खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकाला धमकावले…

पिंपरी : येथील जयहिंद शाळेसमोरील कार्यालयात, एका ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिकाला डांबून त्याच्याकडून पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली. ही घटना २७ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा ते दोनच्या सुमारास घडली. या प्रकरणी माजी नगरसेवक अमर मूलचंदानी, नरेंद्र यादव, महादेव साबळे, सुनील डोंगरे व इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. महेंद्र रामकरणदास अगरवाल (वय ६२, रा. दुरानी कॉलनी, […]

अधिक वाचा...

Video: पिंपरी-चिंचवडमधील बावधन येथे जमिनीच्या ताब्यावरून तणाव आणि गोळीबार…

पुणे : पिंपरी-चिंचवड येथील बावधन परिसरात गुरुवारी मध्यरात्रीनंतर जमिनीच्या ताब्यावरून तणाव निर्माण झाल्याची घटना रात्री पावणे एकच्या सुमारास घडली. शिंदे गटाचे पदाधिकारी बाळासाहेब चांदेरे यांनी संबंधित जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.   View this post on Instagram   A post shared by www.policekaka.com (@policekaka_news) घटनास्थळी उपस्थित असलेल्या कामगारांना धक्काबुक्की करण्यात आल्याचेही […]

अधिक वाचा...

पुणे! संक्रांतीच्या दिवशीच ट्रकच्या धडकेत सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू…

पुणे : संक्रांतीनिमित्त साड्या खरेदी करण्यासाठी जात असताना सख्ख्या बहिणींच्या दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिल्याने दोघींचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवडच्या काळेवाडीतील बीआरटी मार्गावर तापकीर चौकाकडून काळेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर रहाटणी फाटा येथे बुधवारी (ता. १४) दुपारी सव्वाच्या सुमारास ही घटना घडली. ऐन सणाच्या दिवशी दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. ऋतुजा पांडुरंग शिंदे […]

अधिक वाचा...

पुणे! पिंपरी-चिंचवडमध्ये युवतीची सपासप वार करून भररस्त्यात परप्रांतीयांनी केला खून…

पुणेः पिंपरी-चिंचवड परिसरात एका युवतीची दोन परप्रांतीय युवकांनी निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी भररस्त्यात युवतीचा खून केला. यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. आरोपी पळून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या काही तासांत पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. कोमल भरत […]

अधिक वाचा...

पुण्यात 15व्या मजल्यावरून उडी घेत जीव देणाऱ्या विद्यार्थिनीचे मृत्यूचे कारण समोर…

पुणे: पिंपरी परिसरातील एका नामांकित कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने काही दिवसांपूर्वी इमारतीच्या 15 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली होती. पण पीडित मुलीने जीवन संपवण्याआधी मैत्रिणीला पाठवलेल्या एका मेसेजमुळे तिच्या आत्महत्येचं कारण समोर आले आहे. सहिती रेड्डी (वय २०) असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव आहे. ती […]

अधिक वाचा...

पिंपरीमधील पोलिसकाकाचा बंदोबस्तावरून घरी जाताना अपघाती मृत्यू…

पुणेः वर्षाखेरीस दिवस-रात्र बंदोबस्त करून पहाटे घरी जात असताना एका पोलिस उपनिरीक्षकाचा अपघाती मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज (बुधवार) पहाटे महाळुंगे येथे घडली आहे. जितेंद्र गिरनार असे मृत्यू झालेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. जितेंद्र गिरनार हे महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात नेमणुकीस होते. वर्षाखेरीस ते दिवस-रात्र बंदोबस्तासाठी तैनात होते. बुधवारी पहाटे बंदोबस्त संपवून ते घरी निघाले […]

अधिक वाचा...

पिंपरी-चिंचवडमध्ये पाण्याची टाकी कोसळून 5 जणांचा मृत्यू…

पुणेः पिंपरी-चिंचवडमध्ये आज (गुरुवार) सकाळी पाण्याची टाकी कोसळून पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भोसरीतील सदगुरु नगर या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पिंपरी-चिंचवड परिसरातील भोसरीच्या सदगुरु नगर या ठिकाणी असलेली एक पाण्याची टाकी कोसळली. या ठिकाणी लेबर कॅम्पमधील काही कामगार राहत होते. बिल्डरने […]

अधिक वाचा...

हरिहरेश्वरमध्ये मद्यधुंद पर्यटकांना रुम नाकारली; महिलेला कारखाली चिरडलं…

रायगड : पिंपरी-चिंचवड येथील पर्यटकांनी हरिहरेश्वर समुद्रकिनारी असलेल्या अभी धामणस्कर यांच्या हॉटेलमध्ये रूमसाठी विचारणा केली. यावेळी रुमच्या रेटवरुन त्यांच्यात वाद झाला. दारूच्या नशेत असलेल्या पर्यटकांनी यावेळी हॉटेल व्यवसायिक अभी धामणस्कर यांना मारहाण केली. शिवाय, त्यांची बहीण ज्योती धामणस्कर तिथून निघून जात असताना तिला स्कॉर्पिओखाली चिरडल्याची घटना मध्यरात्री दीड वाजता ही घटना घडली आहे. कोकणात श्री […]

अधिक वाचा...

पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट, 5 जण होरपळले…

पुणेः पिंपरी-चिंचवडमध्ये घरगुती गॅसचा स्फोट झाला असून, स्फोटामध्ये पाच जण जखमी झाले आहेत. पिंपरीच्या बौद्ध नगरमध्ये आज (बुधवार) सकाळी ही घटना घडली आहे. गॅसचा स्फोटात होरपळलेल्या पाच ही रुग्णांना आधी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यानंतर पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात येत आहे. स्फोट नेमका कशामुळे झाला, याचे कारण शोधले जाते आहे. गॅस […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!