
हृदयद्रावक! जळगावमध्ये ट्रकची दुचाकीला धडक; चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू…
जळगाव : जामनेर ते बोदवड मार्गावरील मालदाभाडी गावाजवळ एका भरधाव ट्रकने दुचाकी जोरात धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरता हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघाताचे वृत्त समजताच मालदाभाडी परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या दुर्घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यावर शोककळा पसरली असून एकाच क्षणात पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
ट्रकने दुचाकीला धडक दिल्यानंतर दुचाकीवरील सर्वजण रस्त्यावर फेकले गेले. मृतांमध्ये अवघ्या तीन महिन्यांच्या चिमुकल्या बाळासह दोन लहान मुले, दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील सहा जणांचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत व्यक्ती मध्य प्रदेशातील बर्हाणपूर येथील रहिवासी असल्याचे प्राथमिक माहिती आहे.
View this post on Instagram
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेतली आणि ग्रामस्थांच्या मदतीने मदतकार्य सुरू केले. अपघातातील सर्व मृतदेह रुग्णवाहिकेतून पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर कार्यवाहीसाठी जामनेर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. मृतांची अधिकृत नावे शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, अपघात नेमका कसा घडला, दुचाकीवर किती जण प्रवास करत होते आणि ट्रकची धडक कशा प्रकारे झाली, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. मृतांची अधिकृत ओळख आणि अपघाताची नेमकी कारणे याबाबतही अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे. अधिकृत माहिती समोर आल्यानंतर अपघाताचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन आणि भरधाव वेगामुळे अशा धोकादायक घटना घडत असल्याचे समोर येत असून, या दुर्दैवी घटनेने रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आणला आहे.
तुळजापूरला देवीची ज्योत आणायला गेलेल्या तीन युवकांचा अपघाती मृत्यू…
हृदयद्रावक! पैठणमध्ये भीषण अपघात बाप-लेकीसह तिघांचा मृत्यू…
समृद्धी महामार्गावरून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन जाताना भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू…
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमवर शोककळा; लेखकाचे अपघाती निधन…
ठाणे-बेलापूर मार्गावर भीषण अपघात; जावई आणि सासऱ्याचा दुर्दैवी मृत्यू…

