पुणे शहरात दहीहंडी रात्री 10 वाजेपर्यंत: पोलिस

पुणे : पुणे शहरात दहीहंडी उत्सव रात्री 10 वाजेपर्यंतच साजरा करता येणार आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालय आणि राज्य सरकारच्या आदेशाचे पालन करण्यात येईल, असे पुणे शहर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पुणे शहरातील काही सार्वजनिक मंडळांनी याआधी दहीहंडी उत्सवाला रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देण्याची मागणी केली होती. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत डॉल्बीच्या वापराला बंदी आहे. तर राज्य सरकारकडून दहीहंडी उत्सवासाठी वेळ वाढवून देण्याबाबत निर्णय झालेला नाही आहे. त्यामुळे शहरात रात्री 10 वाजेपर्यंतच दहीहंडी उत्सवाला परवानगी देण्यात आली आहे.

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्त्यावर दरवर्षीप्रमाणे यंदा विविध दहीहंडी उत्सव मंडळांकडून दहीहंडी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे मजुर अड्डा चौक (बुधवार चौक) ते दत्तमंदिर चौक, बेलबाग चौक ते सेवासदन चौक, मजुर अड्डा चौक ते अप्पा बळवंत चौक, महात्मा फुले मंडई, महाराष्ट्र साहित्य परिषद, नवी पेठ या ठिकाणी होणाऱ्या दहीहंडी उत्सवासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. पुण्यात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून काळजी घेतली जाणार आहे.

पुणे शहरातील बाजीराव रोड, मंडई, बाबूगेनू हे पुण्यातील मोठे दहीहंडी मंडळे आहेत. त्याशिवाय पुण्यातील विविध चौकात अनेक कार्यकर्त्यांकडून दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. नागरिक हा उत्सव पाहण्यासाठी घराबाहेर पडतात. मात्र यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्तदेखील तैनात करण्यात येतो. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस कायम तत्पर असतात किंवा अपघात झाल्यास लवकरात लवकर उपचार मिळावेत यासाठी संपूर्ण सुविधा देण्यात येते. दरवर्षी लाखो रुपयांची बक्षीसंदेखील देण्यात येतात.

पुणे पोलिस आयुक्तांनी केली सात जणांवर निलंबणाची कारवाई…

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; रात्रीत 159 गुन्हेगारांना अटक…

पुणे शहरातील १४ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा यादी…

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!