पोलिस उप आयुक्त स्मार्तना पाटील यांनी पाच गुन्हेगारांना केले हद्दपार; पाहा नावे…

पुणे (संदीप कद्रे): पोलिस उप आयुक्त स्मार्तना पाटील यांनी गुन्हेगार पार्श्वभुमी असलेल्या ०५ गुन्हेगारास हद्दपार केले आहे.

पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ०२ मधील पोलिस स्टेशनचे गुन्हे अभिलेखावर खुन करणे, खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी, दरोडा, दरोडयाची तयारी करणे, जबरी चोरी करणे, बलात्कार, विनयभंग, बाल लैगिंक अत्याचार करणे, पुरावा नष्ट करणे, गंभीर दुखापत करणे, दहशत माजवणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, बेकायदेशीर घातक हत्यारे बाळगणे, शिवीगाळ, मारहाण अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील क्रियाशील गुन्हेगारांवर कायद्याचा दबाव रहावा म्हणून संबंधीत पोलिस स्टेशन कडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी पाठविलेल्या तडीपार प्रस्तावावरुन पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ०२, पुणे शहर यांनी प्रस्तावाची चौकशी पुर्ण करुन खालील नमुद ०५ गुन्हेगारा विरुध्द महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५५ व ५६ प्रमाणे पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय व पुणे जिल्हयातून तडीपार आदेश केलेले आहेत.

तडीपार करण्यात आलेल्या आरोपीमध्ये बंडगार्डन पोलिस स्टेशन हद्दीतील महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५५ प्रमाणे
१) नटी उर्फ रोहन ऊर्फ ऋषिकेश मोहन निगडे, वय २८ वर्षे, धंदा काही नाही, रा. विश्वदीप तरुण मंडळाजवळ, १३ ताडीवाला रोड, पुणे.
२) अजय काळुराम साळुंके उर्फ धार अज्या, वय २३ वर्षे, रा. लोकसेवा तरुण मंडळाजवळ, म्हशीचे गोठ्याजवळ, १३ ताडीवाला रोड, पुणे.
३) संतोष सिध्दार्थ चव्हाण, वय २७ वर्षे, रा.४४८, रेल्वे कॉटर्स, नवरत्न तरुण मंडळाशेजारी, १३ ताडीवाला रोड, पुणे.
४) अजय उर्फ सोन्या गिरीप्पा दोडमणी, वय २६ वर्षे, रा. लोकसेवा वसाहत, १३ ताडीवाला रोड, पुणे.
५) महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५६ प्रमाणे आशिष सुनिल मापारे, वय २७ वर्षे, रा. आळंदी म्हातोबाची, आळंदी स्टेशन जवळ, ता. हवेली, जि. पुणे सध्या इनआम मस्जिद जवळ, बिल्डींग नं.५८३, रुम नं.०६, प्रायव्हेट रोड, पुणे यांचा समावेश आहे.

सदर कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, संदीप कर्णिक, पोलिस सह आयुक्त, पुणे शहर, प्रविण पाटील, अपर पोलिस आयुक्त, प.प्रा.वि., पुणे शहर यांचे
मार्गदर्शनाखाली करणेत आलेली आहे. यापुढील काळात देखील पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ०२ हद्दीतील रेकॉर्डवरील क्रियाशील गुन्हेगारांवर अशाच प्रकारची ठोस प्रतिबंधक कारवाई करुन गुन्हेगारास प्रतिबंधक करणेकामी भर देण्यात येणार आहे.

Video: पुणे शहरातील कोयता गॅंगच्या दहशतीचा व्हिडीओ व्हायरल…

पुणे शहरातील चिक्यासह त्याच्या दोन साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई…

पुणे शहरात दहीहंडी रात्री 10 वाजेपर्यंत: पोलिस

पुणे शहरातील ३५ गुन्हेगारांना केले हद्दपार…

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!