
पुणे! विद्यार्थ्याने नशेत भरधाव कार चालवत 4 वाहनांना उडवलं; धक्कादायक Video…
पुणे : एका विद्यार्थ्यानं दारूच्या नशेत रस्त्यावरच धिंगाणा घातला. त्याने नशेत भरधाव वेगात आणि कार पळवली आणि तीन ते चार वाहनांना धडक दिली. ही ड्रिंक अँड ड्राइव्हची घटना पुण्यातील कोथरूड परिसरात गुरुवारी (ता. १५) रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर परिसरातील शेकडो नागरिकांनी या युवकाला गाडीतून खाली उतरवलं आणि घेरलं.
View this post on Instagram
दारूच्या नशेत असल्याचा आरोप असलेल्या विद्यार्थ्याने (वय २४) भरधाव कारने पौड रोडवरील MIT कॉलेजजवळ तीन ते चार दुचाकींना धडक दिली. या अपघातात तीन ते चार दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघातानंतर संतप्त झालेल्या आसपासच्या नागरिकांनी तरुणाची कार अडवली. यानंतर कारचालकाला बाहेर काढण्यात आलं आणि सगळ्यांनी घेरून जाब विचारला. शिवाय, काही जणांनी मारहाण केली. तरुणाच्या या गोंधळामुळे परिसरात खळबळ उडाली होती. नागरिकांनी घटनेनंतर शेवटी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संबंधित चालकाला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले. यानंतर अखेर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र, या धक्कादायक घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचं वातावरण पसरलं होतं. तसंच वाहतूक कोंडी झाली होती. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
Video! पुणे शहरात MPSCच्या विद्यार्थ्याचे मैत्रिणीच्या प्रियकरानं केले अपहरण अन्…
Video! पुणे जिल्ह्यात टोळक्याने युवकाला बोनेटवरुन फरफटत नेलं अन्…
Video: पुणे शहरात युवकावर कोयत्याने सपासप वार, पुलावरून खाली पडला अन्…
Video: पुणे पोलिस दलातील ‘मार्शल’ ठरले देवदूत; सीपीआर देऊन वाचवले प्राण…
Video: पुणे पोलिसांनी टोळक्याला पळू-पळू मारले; पळती भुई झाली थोडी…

