पुणे ! स्वारगेट एस.टी. स्टँन्ड परिसरातील प्रवाशांचे दागीने चोरणारी महिला जेरबंद…
पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एस.टी. स्टँन्ड परिसरातील प्रवाशांचे सोन्याचे दागीने चोरी करणाऱ्या महिला चोरटयास स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. गुन्ह्यातील एकुण २,३५,०००/- रुपये किंमतीचे २३.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने जप्त करुन दाखल गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. स्वारगेट पोलिस स्टेशन गुन्हा रजि नं २३५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) […]
अधिक वाचा...जळगाव ! दसऱ्याच्या दिवशीच युवकाची भोसकून हत्या…
जळगाव: जळगाव जिल्ह्यातील कासमवाडी परिसरात दोन कुटुंबातील वादातून एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ऐन दसऱ्याच्या दिवशी वाद झाल्यानंतर युवकावर धारदार चाकुने वार करण्यात आले. वार वर्मी लागल्याने युवकाचा रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला. या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नाना उर्फ ज्ञानेश्वर भिका पाटील (वय २७) असे हत्या झालेल्या […]
अधिक वाचा...युवकासोबत ठरला 500 रुपयांत शरीरसंबंधचा सौदा अन् केलं कांड…
मुंबई: मुंबईच्या गिरगाव परिसरात एका युवकासोबत फसवणुकीची धक्कादायक प्रकार घडला आहे. शारीरिक संबंधाच्या आमिषाला बळी पडून अनोळखी महिलेवर विश्वास ठेवला आणि अडकला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. एका युवतीने ५०० रुपयांत शारीरिक संबंधाचे आमिष दाखवून एका युवकाला लुबाडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी व्ही. पी. रोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात ऐन सणासुदीत पत्नीची हत्या अन् नवऱ्याची आत्महत्या…
पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात नवऱ्याने पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. दौंड तालुक्यातील रावणगाव मध्ये ही घटना घडली आहे. पती-पत्नीमध्ये घरगुती वाद झाल्यानंतर रागाच्या भरात अशोक गावडे याने पत्नी जयश्री यांचा गळा दाबून खून केला. […]
अधिक वाचा...Video: अभिनेत्री काजोल सोबत दुर्गा पूजेदरम्यान नको ते घडलं…
मुंबई : अभिनेत्री काजोल विजयादशमीनिमित्त दुर्गा पूजा करण्यासाठी गेली होती. दुर्गा पूजा पंडालमधील काजोलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक पुरूषाने तिला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केल्यामुळे तिचा पारा चढला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. इन्स्टंट बॉलिवूडने दुर्गा पूजा मंडपातील काजोलचा एक व्हिडिओ शेअर केला […]
अधिक वाचा...गॅंगस्टर निलेश घायवळ याचा आणखी एक कारनामा समोर…
पुणे: पुणे शहरातील कोथरूड परिसरातील गोळीबार आणि कोयत्याने हल्ला झाल्यानंतर घायवळ गॅंगची प्रमुख गॅंगस्टार निलेश घायवळ हा पत्नी आणि मुलासह युरोपला पळाला आहे. पोलिसांनी सुरू केलेल्या चौकशीदरम्यान नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. निलेश घायवळ आणि त्यांच्या पत्नीच्या नावे दोन वेगळ्या मतदारसंघात चार मतदान ओळखपत्रे असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी समोर आणली आहे. […]
अधिक वाचा...एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्याबाबत मोठी माहिती समोर…
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्या खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणात मोठा खुलासा समोर आला आहे. प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींनी अंमली पदार्थांचे सेवन केले नसल्याचा फॉरेन्सिकचा रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात प्रांजल खेवलकर तब्बल दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ कारागृहात होते. नुकतीच […]
अधिक वाचा...क्लिनर अपहरण प्रकरण! मनोरमा खेडकरने मिळवला परस्पर अटकपूर्व जमीन…
मुंबईः एका क्लीनरच्या अपहरण प्रकरणात गुन्हा दाखल असलेली मनोरमा खेडकर हिने वकिलासोबत थेट न्यायालयात हजेरी लावून अटकपूर्व जामीन मिळवला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा नवी मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांकडेच तिच्या न्यायालयात हजेरी लावण्याची माहिती नव्हती, असे स्वतः पोलिसांनीच स्पष्ट केले आहे. दिलीप खेडकरने नवी मुंबईतून एका क्लीनरचे अपहरण केल्यानंतर रबाळे पोलिस […]
अधिक वाचा...75 वर्षांच्या आजोबांचे 35 वर्षीय महिलेशी लग्न; हनिमूनच्या रात्रीच मृत्यू…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एक 75 वर्षांच्या आजोबांनी 35 वर्षीय महिलेशी लग्न केले. पण, हनिमूनची रात्र आजोबांसाठी शेवटची रात्र ठरली. सकाळी त्याचा मृत्यू झाल्यामुळे जौनपूर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. कुचमुच गावात राहणारे शेतकरी संगरू राम (वय ७५) यांनी जलालपूरमधील मानभावती (वय ३५) या महिलेसोबत लग्न केले […]
अधिक वाचा...गँगस्टर निलेश घायवळ पळाला स्विझर्लँडला, पुणे पोलिसांनी आवळल्या नाड्या….
पुणे: कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ याने कोथरूडमध्ये झालेल्या गोळीबारानंतर लंडनला पळ काढला. लंडनमधून त्याने स्विझरलँड पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनी त्याच्या नाड्या आवळल्या असून, त्याच्यासह कुटुंबीयांची आणि त्याच्या मालकीच्या एका व्यावसायिक आस्थापनेची मिळून विविध बँकांतील दहा खाती पोलिसांनी गोठवली आहेत. पुणे पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांच्या आर्थिक स्रोतांवर घाव घालण्याचा निर्णय घेतला असून, त्यातूनच […]
अधिक वाचा...
