धक्कादायक! सावकाराने पतीसमोरच पत्नीवर केला बलात्कार…
पुणे: खाजगी सावकाराने पतीसमोरच पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी इम्तियाज हसीन शेख (वय 47) याच्याविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीला आरोपीने उसने पैसे दिले होते. उसने घेतलेले हे पैसे फिर्यादीचा पती परत करु शकला नाही. त्यामुळे आरोपीने फिर्यादी आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देत हडपसर येथील म्हाडा कॉलनीत बोलावून घेतले. त्यानंतर तक्रारदार महिलेच्या पतीला समोर बसून चाकूचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकी दिली. शिवाय, तक्रारदार महिलेसोबत पतीसमोरच जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले.
शिवाय, या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आरोपीने मोबाईल कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड देखील तयार केला. त्यानंतर पुन्हा आरोपीने फिर्यादी महिलेकडे शरीरसंबंधाची मागणी केली. मात्र महिलेने नकार दिल्याने आरोपीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला. यानंतर महिलेने हडपसर पोलिस स्टेशन गाठत तक्रार नोंदवली. तक्रार आल्यानंतर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी इम्तियाज हसीन शेखला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.