
येरवडा हद्दीत गुन्हे करणाऱया टोळीवार मोक्का अंतर्गत कारवाई; पाहा नावे…
पुणेः येरवडा पोलिस स्टेशन हद्दीत गुन्हे करणारा टोळी प्रमुख अनिकेत ऊर्फ दत्ता राजु साठे व त्याचे इतर ०६ साथीदार यांचेविरूध्द मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
अनिकेत ऊर्फ दत्ता राजु साठे (वय २१ वर्षे, रा. स. नं. २, मदर तेरेसा नगर, येरवडा, पुणे ( टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०६ साथीदारांसोबत संघटित टोळी तयार करुन, फिर्यादी यांनी सन २०१९ मध्ये दाखल केलेली खुनाची केस मागे घेण्यासाठी फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याचे उद्देशाने त्यांचे घातक शस्त्राने वार केले. तसेच त्यांचे हातातील हत्यारे हवेत फिरवुन, सदर परिसरात दहशत पसरवली सदरबाबत त्यांचेवर येरवडा पोलिस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं.६२३ / २०२२, भा.दं.वि. ३०७, १४३, १४७, १४८,५०६, आर्म अॅक्ट ४ (२५), म.पो.अधि.३७ (१) (३) १३५, क्रि. लॉ ओमें क.३ व ७ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
तपासा दरम्यान यातील आरोपी
१) अनिकेत ऊर्फ दत्ता राजु साठे, वय – २१ वर्षे, रा.स.नं.२,मदर तेरेसा नगर, येरवडा, पुणे (टोळी प्रमुख)
२) आदित्य सतीष घमरे, वय १९ वर्षे, रा. सदर
३) रौनक ऊर्फ टक्या आजेश चव्हाण, वय – २० वर्षे
४) अभय चंद्रकांत जंगले, वय २१ वर्षे, रा. पर्णकुटी पायथा, येरवडा, पुणे
५) अमन गणेश भिसे, वय २० वर्षे, रा. स. नं. ०२, मदर तेरेसा नगर, येरवडा पुणे
६) रुतिक राजु साठे, वय – २२ वर्षे
७) राजु कचरु साठे, वय ५० वर्षे, रा. सदर ( टोळी सदस्य) यापैकी आ. क्र. १ ते ६ हे पाहिजे आरोपी असून, आ. क्र. ७ यास अटक करण्यात आली आहे.
सदर आरोपी अनिकेत ऊर्फ दत्ता राजु साठे (टोळी प्रमुख) याने त्याचेसह अन्य सदस्यांसाठी आपले अधिपत्याखाली प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवुन, स्वतःची संघटीत टोळी तयार करून, अवैद्य मार्गाने अर्थिक फायदा मिळविण्याचे उद्देशाने स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी, संघटित गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे, हिंसाचाराचा वापर करुन अथवा हिंसाचाराची धमकी देवून किंवा धाकदपटशहा दाखवुन, खुन करणे, खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, बेकायदेशीर प्राणघातक हत्यारे जवळ बाळगुन परिसरात दहशत माजवणे, मालमत्तेचे नुकसान करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे वारंवार केलेले आहेत. त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील सुध्दा त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत.
आरोपींनी संघटीतपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे बेकायदेशिरपणे आर्थिक फायदया करीता सदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आल्याने तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३(१)(ii).३(२),३(४) प्रमाणेचा अंर्तभाव करणेकामी येरवडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी पोलिस उप-आयुक्त परिमंडळ – ०४, पुणे, शशिकांत बोराटे यांचे मार्फतीने अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे, रंजन कुमार शर्मा यांना सादर केलेला होता. सदर प्रकरणाची छाननी करून वरील आरोपी यांना येरवडा पोलिस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं.६२३/२०२२,भा.दं.वि. कलम ३०७, १४३, १४७, १४८,५०६, आर्म अॅक्ट ४ (२५), म.पो.अधि. ३७ (१)(३)१३५, क्रिमी.लॉ.अमें.क.३ व ७ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२), ३(४) प्रमाणेचा अंर्तभाव करण्याची मा. अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग,पुणे, रंजन कुमार शर्मा यांनी मान्यता दिली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलिस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे, किशोर जाधव हे करीत आहेत.
सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त, संदिप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे, रंजनकुमार शर्मा, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ-०४, पुणे, शशिकांत बोराटे, बोराटे, सहा. पोलिस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे, किशोर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक, येरवडा पोलिस स्टेशन बाळकृष्ण कदम, पोलिस निरीक्षक (गुन्हे), उत्तम चक्रे तपास पथकाचे पोलिस उप-निरीक्षक, रविंद्रकुमार वारंगुळे, अंकुश डोंबाळे व सर्व्हेलन्स पथकातील पोलिस अंमलदार यांनी केला आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्या बाबत सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही १४ वी कारवाई आहे.