
जळगाव ! दसऱ्याच्या दिवशीच युवकाची भोसकून हत्या…
जळगाव: जळगाव जिल्ह्यातील कासमवाडी परिसरात दोन कुटुंबातील वादातून एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ऐन दसऱ्याच्या दिवशी वाद झाल्यानंतर युवकावर धारदार चाकुने वार करण्यात आले. वार वर्मी लागल्याने युवकाचा रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला. या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
नाना उर्फ ज्ञानेश्वर भिका पाटील (वय २७) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार चाकुने तीन वार केले होते. या गंभीर हल्ल्यात ज्ञानेश्वर याचे मूत्रपिंड फाटले. नातेवाईकांनी तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पण मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान ज्ञानेश्वरचा मृत्यू झाला. हत्येची ही घटना उघडकीस येताच मृताच्या नातेवाईकांनी जीएमसीत मोठी गर्दी केली. रुग्णालय परिसरात तणावाच् वातावरण निर्माण झाल्यानंतर घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.
जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे जिल्ह्यात ऐन सणासुदीत पत्नीची हत्या अन् नवऱ्याची आत्महत्या…
एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्याबाबत मोठी माहिती समोर…
पुणे! गौतमी पाटील हिच्या कारला भल्या पहाटे भीषण अपघात…
जळगाव! आंतरराष्ट्रीय बनावट कॉल सेंटरचा पोलिसांनी केला पर्दाफाश…
जळगाव! गायत्री पाटील प्रकरणाला मिळालं नवं वळण…

