बिबवेवाडी पोलिसांनी जबरी चोरी करणाऱ्यास २४ तासाच्या आत केली अटक…
पुणे (संदीप कद्रे): बिबवेवाडी पोलिसांनी जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगारास २४ तासाच्या आत अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
२६/०७/२०२३ रोजी सायंकाळी ०५.०० वा.चे सुमारास फिर्यादी व त्यांचा मित्र असे इतर मित्रांना क्लासला बोलविण्यासाठी जात असताना ते दुर्गामाता गार्डन समोर, सुपर बिबवेवाडी पुणे येथे आले होते. एक अनोळखीने त्यांना जवळ बोलावून ओला बुक करण्याचा बहाणा करून फिर्यादी व त्यांचा मित्र या दोघांचे हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसका मारून चोरून पळून गेला म्हणून त्याचेविरूध्द फिर्यादी यांनी तक्रार दिलेने भा.दं.वि.सं.कलम ३९२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दाखल गुन्हयातील अनोळखी आरोपीचा वरिष्ठ पोलिस निरीक्षक सविता ढमढेरे यांचे मार्गदर्शनाखाली तपासपथक प्रमुख सहा. पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलिस उप निरीक्षक संजय आदलिंग, तपासपथकातील अमंलदार यांनी गुन्हयाचे घटनाठिकाणापासून ते आरोपी गेलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून पोलिस अमंलदार प्रणव पाटील व शिवाजी येवले यांना मिळालेल्या बातमीवरून आरोपी मनोज मोहन वानखेडे (वय २० वर्षे रा. ओंकार हाईटस फ्लॅट नं. ५०१, धायरेश्वर मंदिराजवळ, गोकुळनगर चौक, धायरी पुणे. मुळ- माजलगांव, ता. माजलगांव, जि. बीड) यास ताब्यात घेवून गुन्हयात अटक करण्यात आली आहे. तपासामध्ये फिर्यादी यांचा एक विवो कंपनीचा मोबाईल व साक्षीदार यांचा एक रेडमी कंपनीचा मोबाईल कि.रु.२०,०००/- चे हे जप्त करण्यात आलेले आहेत. दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहा.पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त पुणे शहर संदिप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, परिमंडळ ०५ चे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख, वानवडी विभागाचे सहा. पोलिस आयुक्त शाहुराजे साळवे, बिबवेवाडी पोलिस ठाणे चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सविता ढमढेरे, पोलिस निरीक्षक गुन्हे संजय पतंगे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलिस उप निरीक्षक श्री संजय आदलिंग, पोलिस अमंलदार संतोष जाधव, प्रणय पाटील, शिवाजी येवले, ज्योतिष काळे, अभिषेक धुमाळ, सतिष मोरे व तानाजी सागर यांनी केली आहे.
लोणीकंद पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा उघड करून मुद्देमाल केला हस्तगत…
पुणे शहरात गस्त दरम्यान पकडलेला निघाला उस्मानाबाद आरोपी…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…