
Video: अभिनेत्री काजोल सोबत दुर्गा पूजेदरम्यान नको ते घडलं…
मुंबई : अभिनेत्री काजोल विजयादशमीनिमित्त दुर्गा पूजा करण्यासाठी गेली होती. दुर्गा पूजा पंडालमधील काजोलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक पुरूषाने तिला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केल्यामुळे तिचा पारा चढला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.
इन्स्टंट बॉलिवूडने दुर्गा पूजा मंडपातील काजोलचा एक व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शन लिहिलं, ‘जेव्हा बॉडी गार्डने काजोलला रोखलं तेव्हा तिला धक्का बसला’
View this post on Instagram
काजोलच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये, अभिनेत्री पायऱ्या उतरताना असताना एका व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. यामुळे काजोल चिडली आणि त्याच्याकडे रागाने पाहू लागली. संबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहे. संबंधित व्यक्ती बॉडी गार्ड नव्हता, तर त्याने काजोलला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आहे. व्हायरल व्हिडिओवर एका चाहत्याने लिहिले आहे की, ‘ही सुरक्षा नाही, तर एक अश्लील काका आहे.’ दुसऱ्या चाहत्याने कमेंट केली, ‘ती त्याच्या स्पर्शामुळे वैतागली चिडली. कृपया या व्यक्तीला जाब विचारा, अजय देवगण. हे खूप वाईट आहे, हे सर्व प्रकार चुकीचे आहेत. आपण महिलांसोबत अशा प्रकारचे वर्तन होऊ देऊ नये, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स नोंदवत आहेत.
दरम्यान, काजोल आणि पती अजय देवगण यांनी त्याच्या मुलांची नावं न्यासा आणि युग यांच्या अक्षरांवरुन NY सिनेमा असे केले होते. पण, नवरात्रीनिमित्तानं ते बदलून ‘देवगण सिनेक्स’ असे ठेवले आहे, ज्याची एक झलक या काजोल आणि अजयने त्यांच्या चाहत्यांसह शेअर केली आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री दिशा पटानी हिच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींचा एन्काऊंटर…
अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्या व्हिडीओने उडवली एकच खळबळ…
अभिनेत्री प्रीती झिंटाने हुतात्मा जवानांच्या पत्नींसाठी केला मदतीचा हात पुढे…
पॉर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री अडचणीत; ईडीकडून सात तास चौकशी…
संजय कपूर यांच्या निधनानंतर अभिनेत्री करिश्मा कपूरची पहिली पोस्ट; म्हणाली…

