Video: ‘जेलर’ फेम अभिनेता विनायकनला अटक; कारण…
चेन्नईः दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या सोबत ‘जेलर’ चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता विनायकन याला केरळ पोलिसांनी अटक केली आहे. एर्नाकुलम टाउन नॉर्थ पोलीस ठाण्यात अभिनेत्याने दारुच्या नशेत राडा केला आहे. विनायकन यांना त्यांच्या सोसायटीत काही समस्यांचा सामना करावा लागत असल्याने चौकशीसाठी पोलिसांनी त्यांना बोलावले होते. यावेळी पोलिस ठाण्यात त्यांनी राडा घातल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली […]
अधिक वाचा...मदरशातल्या 10 विद्यार्थ्यांवर शिक्षकाने केला अनैसर्गिक बलात्कार…
अहमदाबाद (गुजरात) : जुनागढ जिल्ह्यात असलेल्या मदरशामधील 10 विद्यार्थ्यांवर शिक्षकाने अनैसर्गिक बलात्कार केला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. जुनागढ जिल्हा पोलिसांनी सोमवारी मदरशाच्या शिक्षकाला (मौलवी) आणि मदरशाच्या 55 वर्षांच्या ट्रस्टीला अटक केली आहे. मदरशाच्या मौलवीवर 10 अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक बलात्कार केल्याचा आरोप आहे, तर ट्रस्टीलाही मुलांनी तक्रार देऊनही काहीच […]
अधिक वाचा...शिंदे गटाच्या शिवसैनिकांच्या तीन बसचा भीषण अपघात…
मुंबईः दसरा मेळावा आटोपून आपापल्या गावी परतणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या तीन बसचा मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २५ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दसरा मेळाव्यावरून परतणाऱ्या शिंदे गटाच्या तीन बसचा शहापूरजवळ कळंभे गावाजवळ मध्यरात्री अडीचच्या सुमारास अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 25 जण […]
अधिक वाचा...निवृत्त पोलिसांना लेखक होण्याची सुवर्णसंधी!
सहभागी होण्याचे पोलिसकाका.कॉमचे आवाहन पुणेः पोलिसदलामध्ये काम करत असताना अनेक जण जीवाची बाजी लावून धडाकेबाज कामगिरी करतात. कोणताही धागा-दोरा हाती नसताना अनेक गुन्हे उघड करून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देत असतात. पोलिसकाकांनी केलेली धडाकेबाज कामगिरी वाचकांपुढे येणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. यामुळे सेवानिवृत्त झालेल्या पोलिसकाकांनी आपण उघड केलेले महत्त्वाचे दोन-तीन गुन्हे आमच्या पर्यंत पोहचविल्यास योग्य त्या […]
अधिक वाचा...लोणीकंद पोलिसांनी २७ लॅपटॉप केले जप्त; १८ गुन्हे उघड…
पुणे (संदीप कद्रे): लोणीकंद पोलिस तपास पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत चोरलेले २७ लॅपटॉप जप्त केले आहेत. सराईत गुन्हेगाराकडून २७ लॅपटॉप ०१ टॅब व ०१ मोबाईल हॅण्डसेट जप्त करुन पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण जिल्हयातील एकुण १८ गुन्हे उघडकीस आणून एकूण १०,८०,००० रुपये किंमतीचा माल जप्त केला आहे. लोणीकंदचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काइंगडे […]
अधिक वाचा...सख्खा भाऊ बनला पक्का वैरी! संतपत्तीवरून दोन बहिणींची केली हत्या…
रायगड : अलिबाग तालुक्यातील भोवाळे गावातील एका भावाने आपल्या 2 सख्ख्या बहिणींना सुपातून विष पाजल्याची संतापजनक घडना घडली आहे. भावाने गुगलवरुन 53 वेगवेगळ्या विषाची माहिती घेतल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. दोन बहिणी अचानक प्रकृती अस्वस्थामुळे सिव्हील हॉस्पिटल अलिबाग येथे दाखल झाल्या होत्या. सोनाली शंकर मोहिते (वय 34 ) हिचा 16 […]
अधिक वाचा...व्याही आणि विहीणमध्ये जुळले प्रेमसंबंध; पळूनही गेले पण…
लखनौ (उत्तर प्रदेश): हरदोई भागातील व्याही आणि विहीण यांच्यामध्ये प्रेमसंबंध जुळले होते. प्रेमसंबंध कुटुंब तसेच समाजापासून लपवून ठेवण्यासाठी दोघे फरार झाले होते. पण, दोघांनी आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. लखीमपूरमधल्या पासीगवानजवळच्या सुहौना गावातले रामनिवास हे खासगी बसचालक होते. रामनिवास यांच्या पत्नीचे सुमारे 15 वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांनी […]
अधिक वाचा...दसऱ्याच्या दिवशी मोटार अपघातात कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू…
रांची (झारखंड) : देशभर आज (मंगळवार) दसरा उत्साह मोठ्या उत्साहात साजरा होत असताना एका कुटुंबावर शोककळा पसरली आहे. देवघर येथे बोलेरो कार उलटून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील दोन लहान मुलांसह ५ जणांचा मृत्यू झाला आहे. कार उलटून ६० फूट खोल गेली. झारखंडमधील देवघरमध्ये आज सकाळी विचित्र अपघात झाला. सिकतिया बॅरेजमध्ये बोलेरो उलटली आणि ६० […]
अधिक वाचा...ललित पाटील प्रकरण! नाशिकमध्ये नदीतून मध्यरात्री कोट्यवधींचा ड्रग्ज साठा जप्त…
नाशिक: ड्रग्ज माफिया ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी सोमवारी (ता. २३) मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहणेर ठेंगोडा गावा दरम्यान असणाऱ्या गिरणा नदीच्या पात्रातील ड्रग्जचा मोठा साठा मुंबई पोलिसांना आढळून आला आहे. ललित पाटीलचा ड्रायव्हर सचिन वाघच्या चौकशीतून ही माहिती समोर आली त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ललित पाटील याचा […]
अधिक वाचा...ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा कधीही एन्काऊंटर होऊ शकतो…
पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा कधीही एन्काऊंटर होऊ शकतो. एवढा मोठा गुन्हा घडून देखील पोलिसांवर किंवा ससूनच्या डिनवर गुन्हा दाखल नाही. हे मोठे रॅकेट असून यामध्ये राजकीय मंडळींचा देखील सहभाग आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कारवाई करण्यात वेळ काढूपणा करत आहेत, असा आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. ललित पाटील प्रकरणी रवींद्र […]
अधिक वाचा...
