मामाने चिमुकल्या भाच्याला पाण्यात बुडून ठार मारले; कारण…

धुळे : चिमुकला भाचा सतत रडत असल्यामुळे मामाने भाच्याला ड्रममध्ये बुडवून ठार मारल्याची धक्कादायक घटना फिरदोस नगर येथे घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसांनी नुरूल अमीन (वय 22) या मामाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिरदोस नगरातील रातराणी चौकात राहणारी मरियम बी एजाज हुसेन ही महिला आपल्या माहेरी गेली होती. त्यावेळी मामा-भाचे खेळत होते. मात्र, मामाकडे आलेला मोहम्मद हाजीक एजाज (वय ४) हा रडू लागला होता. काही केल्या तो शांत होत नव्हता. मोहम्मदच्या आवजाचा त्रास मामा नुरूल अमीन याला झाला. संतापलेल्या मामाने त्याला बाथरूममधील प्लास्टिकच्या ड्रममध्ये टाकले. काही वेळाने मोहम्मद घरात दिसत नसल्याने त्याची आई मरियम बी एजाज अहमद त्याला शोधू लागली. मुलाला शोधत बाथरूम पर्यंत गेली असता मोहम्मद ड्रममध्ये आढळला. नुरुल याने मोहम्मद रडत असल्याने माझे डोके दुखत होते म्हणून आपण त्याला ड्रममध्ये टाकल्याचे कारण सांगितले.

आईने घटनेची माहिती नातेवाईकांनी दिली. नातेवाईकांनी मोहम्मदला तात्काळ हिरे रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी नुरल अहमद याच्यावर चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! पतीचा मृत्यूनंतर मुलाला विष पाजून घेतला जगाचा निरोप…

हृदयद्रावक! पुणे शहरात चहा पित असताना डोक्यावर पडली झाडाची फांदी…

हृदयद्रावक! पत्नी व दोन मुलांचे मृतदेह आणण्याची वेळ आली बापावर…

हृदयद्रावक! दिवाळीच्या सुट्टीत मामाच्या गावाला आल्या अन्…

हृदयद्रावक! गरोदर अभिनेत्रीने बाळाला न पाहताच घेतला जगाचा निरोप…

हृदयद्रावक! आईच्या मृतदेहाला चिकटून रात्रभर रडत राहिला चिमुकला…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!