Video: करणी सेनेच्या अध्यक्षांवर झाडल्या १७ गोळ्या…

जयपूर (राजस्थान): जयपूरमध्ये राष्ट्रीय राजपूत करणी सेनाचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

हल्लेखोरांनी गोगामेडी यांच्यावर १७ गोळ्या झाडल्या. सुखदेव सिंह यांच्यावर झालेल्या गोळीबारात त्यांच्या सोबत असलेले अजीत सिंह देखील गंभीर जखमी झाले आहेत. पोलिस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत अन्य दोघे जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळतात पोलिस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी सर्व प्रमुख मार्गावर नाकाबंदी केली. तसेच सीसीटीव्ही फुटेज देखील तपासण्यास सुरुवात केली आहे.

जयपूर येथील श्याम नगर येथील ऑफिसमध्ये गोगामेडी यांच्यावर हल्ला झाला. यावेळी त्यांच्या सोबत दोन सुरक्षा रक्षक देखील होते. दुपारी दीडच्या सुमारास ३ जण गोगामेडी यांच्या कार्यालयात आले आणि काही मिनिटेत चर्चा केल्यानंतर तिघांनी अचानक गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. आरोपींनी एकूण १७ गोळ्या झाडल्या ज्यातील ४ गोळ्या सुखदेव सिंह यांना लागल्या. जखमी अवस्थेत त्यांना मानसरोवर येथील मेट्रो रुग्णालायत दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. या हल्ल्यात त्यांच्या सुरक्षा रक्षकाला देखील गोळी लागली आणि त्याचा देखील मृत्यू झाला. या हल्ल्यात नवीन सिंह शेखावत यांचाही मृत्यू झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

घटनाक्रम…
– दुपारी १ वाजून ०५ मिनिटांनी ३ जण सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या कार्यालयात पोहोचले. या तिघांनी सुखदेव यांच्याशी १० मिनिटे चर्चा केली.
– दुपारी १ वाजून २१ मिनिटांनी दोघांनी अचानक सुखदेव यांच्यावर गोळ्या झाडल्या. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना स्पष्टपणे दिसत आहे. कार्यालयात चर्चा करत असताना दोघांनी अचानक गोळ्या झाडल्या.
– हल्ल्यात पहिली गोळी सुखदेव यांच्या छातीला लागली. त्यानंतर एका पाठोपाठ एक अशा अनेक गोळ्या झाडण्यात आल्या. गोळी लागल्या क्षणी सुखदेव जमीनीवर पडले. त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या जवळ जाऊन आणखी गोळ्या झाडल्या.
हा सर्व प्रकार घडत असताना सुखदेव सिंह गोगामेडी यांचा एक सुरक्षारक्षक उपस्थित होता. हल्लेखोरांनी त्याच्यावर देखील गोळीबार केला.
– ज्या ३ व्यक्ती सुखदेव यांना भेटण्यासाठी आल्या होत्या त्यापैकी एक जण शाहपुरा येथील नवीन सिंह शेखावत हे होते. हल्लेखोरांनी जेव्हा गोगामेडी यांच्यावर गोळीबार केला तेव्हा शेखावत यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दोन्ही हल्लेखोरांनी शेखावत यांच्यावर देखील गोळीबार केला.
– नवीन सिंह शेखावत सोबत दोन हल्लेखोर आले होते त्यांनी शेखावतवर देखील गोळीबार केला. हाती आलेल्या माहितीनुसार सुखदेव आणि शेखावत यांची ओळख होती. आणि शेखावत यांच्या सोबतच हल्लेखोर आले होते.
– सुखदेव यांच्यावर गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी एका दुचाकीस्वार व्यक्तीवर गोळीबार केला आणि त्याच्याकडून दुचाकी काढून घेत पळ काढला. दोन्ही हल्लेखोर स्कॉर्पियो गाडीतून आले होते. गाडी शेखावत चालवत होते.
सुखदेव सिंह यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेंन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. या गँगशी संबंधीत रोहित गोदाराने फेसबुकवरून सुखदेव यांच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे.

धक्कादायक Video: युवकाला ६० वेळा भोसकले अन् मृतदेहासमोर नाचलाही…

Video: जवानाला भर रस्त्यात लाथा-बुक्क्यांनी मारहाण…

Video: आंदोलन थांबवायला गेलेल्या पोलिस अधिकाऱ्याला बेदम मारहाण…

Video क्रूरतेची हद्द! युवकाच्या अंगावर ८ वेळा ट्रॅक्टर घालून चिरडले…

Video: पोलिसाने पळत जाऊन घातली चोरट्यांच्या दुचाकीला लाथ…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!