रुपाली चाकणकर यांच्याविरोधात सोशल मीडियावर अश्लील मजकूर…

पुणे : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविषयी सोशल मीडियावर अश्लील मजकूर प्रसारित केल्या प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांना ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

रुपाली चाकणकर यांच्या बाबतीत एक अश्लील पोस्ट विकास सावंत, जयंत पाटील, रणजीतराजे हात्तींबरे, अमोल के. पाटील यांनी फेसबुकवर शेअर केली होती. या चौघांवर पुणे सायबर पोलीस ठाण्यात आयपीसी 354 (अ) आणि 509 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत रुपाली चाकणकर यांचे भाऊ संतोष बबन बोराटे यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यातील संशयित असलेल्या जयंत पाटील, रणजीतराजे हात्तींबरे आणि अमोल पाटील यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्यांचे मोबाईल क्रमांक सायबर पोलिसांनी मिळवले. त्याआधारे पोलीस पोलिसांनी जयंत रामचंद्र पाटील या सांगली जिल्ह्यातील धनगरवाडीत राहणाऱ्या आरोपीपर्यंत पोहचले. त्याला ताब्यात घेतले असता तपसादरम्यान तो मानसिक रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले. त्याला सी.आर.पी.सी प्रमाणे नोटीस देऊन त्याचा जबाब नोंदवून मोबाईल जप्त केला आहे.

पोलिसांनी वसंत रमेशराव खुळे (वय 34 रा. रहाटी, ता.जि. परभणी) याला ताब्यात घेतल्यानंतर सायबर पोलीस ठाण्यात आणून त्याचा जबाब नोंदवून घेत फोन जप्त केला. त्याला सी.आर.पी.सी प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे. फेसबुक युजर प्रदीप कणसे नावाने पोस्टवर अश्लील भाषेत कमेंट करण्यात आली होती. पोलिसांनी हे फेसबुक अकाउंट वापरणाऱ्या संशयिताचा मोबाईल क्रमांक प्राप्त करुन त्याला देखील सी.आर.पी.सी प्रमाणे नोटीस दिली आहे. सायबर पोलिसांनी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात फेसबुकवर अश्लील पोस्ट करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्यांचा माग काढून गुन्हा उघडकीस आणला आहे.

पुणे हादरले! एकटेपणाला कंटाळून आजोबांनी घेतला जगाचा निरोप…

पुणे शहरात भोंदू बाबा म्हणाला पैशांचा पाऊस पाडतो अन् अचानक…

पुणे शहरात व्हिडीओ whatsapp ग्रुपला टाकून रिक्षाचालकाने उचलले मोठे पाऊल…

हृदयद्रावक! पुणे शहरात चहा पित असताना डोक्यावर पडली झाडाची फांदी…

पुणे शहरात मैत्रिणीला भेटण्यासाठी घातला बुरखा अन् पुढे…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!