सोलापूर! शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग; आता तु चांगली सापडली…

सोलापूर: एका नामवंत खाजगी शाळेतील 56 वर्षीय शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आल्याची संतापनजक घटना घडली आहे. शाळेच्या पार्किंगमध्ये हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी आरोपी शिक्षकाविरोधात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याने पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुरातील सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत.

सोलापूरमधील एका नामवंत खाजगी शाळेत 19 एप्रिल ते 3 जुलैच्या दरम्यान ही घटना घडली आहे. शाळेच्या पार्किंगमध्ये शिक्षकाने हे कृत्य केलं आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच आरोपी शिक्षकाविरोधात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याने पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थीनीला धमक्या देखील दिल्या होत्या, त्यामुळे ती विद्यार्थींनी घाबरली होती. तुला काही ज्ञान नाही, तू काही कामाची नाहीस, तु दहावीला आहे, आता तु चांगली सापडली आहेस अशा अनेक प्रकारे पीडित विद्यार्थ्यांनीला धमक्या दिल्या होत्या.

दरम्यान, मुख्याध्यापकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांच्या सल्ल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

सोलापूरमधील दीर-वहिणी प्रेमसंबंध! जळलेल्या महिलेलं गुढ उलगडलं…

सोलापूर! मुलाचे गावातील महिलेसोबत प्रेमसंबंध; आईने केला विरोध अन्…

बीड! शिक्षकाची आणखी एक विकृती समोर; गुन्हा दाखल…

शिक्षकाने केलेला अपमान विद्यार्थ्याच्या लागला जिव्हारी; चिठ्ठीत लिहिले की…

शिक्षकाने काढली शाळेतच विद्यार्थिनीची छेड; उसळली संतापाची लाट…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!