पुणे शहरातील खूनाच्या गुन्ह्यातील आरोपींना युनिट 5 कडून अटक…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील खूनाच्या गुन्ह्यातील आरोपींना युनिट 5 कडून 12 तासाच्या आत अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
कोंढवा पोलिस स्टेशन गुन्हा र. न 1229/ 2023 भा द वी कलम 302 मधील मयत बबलू उर्फ शाहनवाज मुनीर सय्यद याचा अज्ञात व्यक्तींनी खून केला होता. सदर गुन्ह्यातील आरोपींचा युनिट 5चे पथक शोध घेत असताना मयत बबलू उर्फ शाहनवाज मुनीर सय्यद याच्याकडून आरोपी साहिल युसुफ शेख (वय 23 वर्ष रा पिसोळी कोंढवा पुणे) याने दीड वर्षापूर्वी पल्सर गाडी विकत घेतली होती. तिचे कागदपत्रांची आरोपी साहिल वारंवार मागणी केली असता मयत त्यास टाळाटाळ करत होता. रात्री मयतासोबत आरोपी साहिल व त्याचे मित्र सद्दाम व नोमान असे दारू पित असताना आरोपी साहिल याने मयताकडे कागदपत्रांची पुन्हा मागणी केली असता, मयाताने दारूचे नशेत आरोपी साहिल यास शिवीगाळ केली.
आरोपी 1. साहिल युसुफ शेख (वय 23 वर्ष रा पिसोली कोंढवा पुणे), 2. सज्जुद्दिन उर्फ सद्दाम सिरखुद्दिन शेख (वय 35 वर्ष रा सायमा अपा शिवणेरीनगर कोंढवा पुणे) व 3. नोमन खान (रा पिसोळी पुणे) यांनी मयत बबलू यास सोबत आणलेल्या चाकूने गळ्यावर व पोटात खुपसून खुन केला आहे. गुन्ह्यातील वापरण्यात आलेला चाकू हा बोपदेव घाट येथे टाकून देण्यात आला असून तो ताब्यात घेण्यात येत आहे. तसेच मयताच्या मोबाईल आरोपी यांनी गोल्डन बेकरी येथील नाल्यामध्ये टाकून दिलेला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. सदर आरोपींपैकी आरोपी साहिल युसुफ शेख, सज्जुद्दिन उर्फ सद्दाम सिरखुद्दिन शेख यांनी गुन्ह्यात वापरलेली सुझुकी बर्गमन गाडी क्र MH 12 VE 2020 सह युनिट 5 टीमने ताब्यात घेतले आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, रामनाथ पोकळे, (सह पोलिस आयुक्त-अति. कार्यभार) अप्पर पोलिस आयुक्त गुन्हे, अमोल झेंडे पोलिस उप आयुक्त गुन्हे, सतीश गोवेकर, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे 2 पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली युनिट 5 गुन्हे शाखा वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी, सहा पो निरीक्षक कृष्णा बाबर, पोलिस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे,चैताली गपाट, पोलिस अमलदार रमेश साबळे, राजस शेख, प्रमोद टिळेकर, प्रताप गायकवाड, दया शेगर, विनोद शिवले, पृथ्वीराज पांडूळे, दाउत सय्यद, अमित कांबळे, अकबर शेख, पल्लवी मोरे यांनी केली आहे.
pun
कोंढवा पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस १० तासात केली अटक…
ललित पाटील प्रकरण! ससूनचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण देवकाते यांना अटक…
पुणे हादरले! एकटेपणाला कंटाळून आजोबांनी घेतला जगाचा निरोप…
लोणीकंद पोलिसांनी समलैंगिक संबधातून खून करणाऱ्याला केली अटक…
पुणे शहरात भोंदू बाबा म्हणाला पैशांचा पाऊस पाडतो अन् अचानक…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!