प्रेमविवाह! डॉक्टरने पत्नीसह 2 मुलांना हातोड्यानं ठेचून मारलं अन् पुढे…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका डॉक्टरने पत्नी, मुलगी आणि मुलाच्या डोक्यात हातोड्याने वार करून त्यांचा खून केला. यानंतर स्वतःही गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रायबरेली येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून चारही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर अरुण सिंह या दाम्पत्याचा प्रेमविवाह झाला होता, मात्र काही कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता. डॉ. अरुण सिंह मॉडर्न रेल कोच फॅक्टरीत डोळ्यांचे डॉक्टर होते आणि ते सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी म्हणून तैनात होते. त्यांचा मृतदेह शासकीय निवासस्थानात फाशीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. बेडवर पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. डॉक्टरने मुलगा, मुलगी आणि पत्नीला ज्या हातोड्याने मारलं तोही जवळच सापडला. पोलिसांनी हातोडा ताब्यात घेतला असून फॉरेन्सिक टीमच्या मदतीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
डॉ.अरुण यांनी प्रथम पत्नी आणि दोन्ही मुलांना नशेचे औषध दिले होते. तिघेही बेशुद्ध होताच डॉक्टरने आधी आपल्या चार वर्षाच्या मुलाला हातोड्याने मारून ठार केले. यानंतर 11 वर्षाच्या मुलीच्या डोक्यावर हातोड्याने वार केले. हा हल्ला इतका जोरदार होता की एकाच वारात मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी डॉक्टरने पत्नीची हत्या करून त्याच खोलीत गळफास घेतला.
डॉक्टरच्या शेजारी आणि नातेवाईकांची चौकशी करण्यात आली आहे. यावेळी या कुटुंबातील कोणीही गेल्या दोन दिवसांपासून घराबाहेर कोणाशीही संपर्क साधला नसल्याचे समोर आले. मंगळवारी रेल्वे कोच फॅक्टरीच्या एका कर्मचाऱ्याला संशय आल्याने त्याने त्यांच्या घरात डोकावून पाहिल्यानंतर आतील दृश्य पाहून पोलिसांना माहिती दिली. यानंतर घटना उघडकीस आली. हत्या आणि आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.
प्रेमविवाहानंतर तिसऱ्याच महिन्यात घडली धक्कादायक घटना…
प्रेमविवाहानंतर नवऱ्यासह पाच जणांचा काढला काटा; गूढ उकलले…
प्रेमविवाह! पोलिसांना मोटारीचा दरवाजा उघडताच बसला धक्का…
प्रेमविवाहाला परवानगी देणाऱ्या सुनेनेच काढला सासऱ्यांचा काटा…
प्रेमविवाह ठरला अन् लग्नाच्या दिवशी नवरदेवाने ठोकली मेहुणीसोबत धूम…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!