हडपसर पोलिसांनी चोरीचा गुन्हा उघड करून मुद्देमाल केला जप्त…

पुणे (संदीप कद्रे): हडपसर पोलिस स्टेशन अंकीत मांजरी चौकी हद्दीतील फिर्यादी यांच्याकडे कामास असलेल्या कामगारांनी चोरी केली होती. पोलिसांना गुन्हा उघडकीस आणला असून, मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हडपसर पोलिस ठाणे गु.र.नं १७७१ / २०२३ भादवि कलम ४२०, ३८१, ३४ मधिल फिर्यादी यांचे सनं. १३० साईहोम मिडोज सोसायटी म्हसोबा वस्ती मांजरी बुद्रुक ता. हवेली जि. पुणे या ठिकाणी असलेल्या कणसे अॅन्ड कंपनी मधील कामगार यांनी पंप चोरी करुन नेलेबाबत तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. मांजरी चौकीचे प्रभारी अधिकारी सचिन दाभाडे सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस शिपाई ९९९३ अंधारे असे दाखल गुन्ह्यासंदर्भाने माहीती घेत असताना प्राप्त झालेल्या माहितीवरुन आरोपी गणेश उत्तम नलावडे (वय २८, रा.ढमाळवाडी भेकराईनगर हडपसर पुणे मुळ रा. मुपो ढांबेवाडी ता. खटाव जि. सातारा), २) दत्तात्रय अर्जुन मुंढे (वय ४४, रा. घुले वस्ती मांजरी बुद्रुक ता. हवेली जि. पुणे मुळ गाव मु भवानवाडी पोस्ट शिवणी ता.जि.बीड) यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदरचे गुन्हयातील पंप हे आरोपी ३) दत्तात्रय अर्जुन मुंढे (वय ४४ वर्षे रा. घुले वस्ती मांजरी बुद्रुक ता.हवेली जि. पुणे मुळ गाव मु भवानवाडी पोस्ट शिवणी ता. जि. बीड) याने त्याचे राहते घरी मुंब्रा भगवतवाडी (जि. ठाणे) या ठिकाणी गाळयामध्ये ठेवले असल्याचे सांगितल्याने त्यांना दाखल गुन्हयात अटक करुन त्याचेकडे तपास करुन दाखल गुन्हयातील चोरी गेलेला एकूण ११ लाख ७० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी ही पोलिस आयुक्त रितेश कुमार, रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग व विक्रांत देशमुख, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली अश्विनी राख, सहाय्यक पोलिस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, रविंद्र शेळके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक हडपसर पोलिस स्टेशन, पुणे शहर, विश्वास डगळे, पोनि. (गुन्हे), संदीप शिवले, पोनि. (गुन्हे) यांचे सुचनाप्रमाणे व मार्गदर्शनाखाली मांजरी चौकीचे प्रभारी अधिकारी सचिन दाभाडे, पोलिस उपनिरिक्षक संतोष गोरे, पोलिस उपनिरिक्षक अशोक गांधले, पोलिस हवा ६४६५ रामदास ढेरे, पोलिस हवा ११६३ प्रदिप क्षिरसागर, पोलिस हवा ६७३ करंजकर, पोलिस हवा ५५०१ पळसे, पोलिस शिपाई ९९९३ अशोक अंधारे, पोलिस शिपाई १०५५० विजयकुमार ढाकणे, पोलिस शिपाई ९९४१ सुनिल आव्हाड यांनी प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

हडपसर तपास पथकाकडून अल्पवयीन मुले ताब्यात; घरफोडीचे गुन्हे उघड…

हडपसर पोलिसांना घरफोडी व वाहन चोरीचा गुन्हा उघड करण्यात यश…

हडपसर पोलिसांकडून परप्रांतीय टोळी गजाआड, लाखो रुपयांचे मोबाईल जप्त…

हडपसर पोलिस स्टेशनची दोन महिन्यात दुसरी मोक्का अंतर्गत कारवाई…

पुणे शहरात भोंदू बाबा म्हणाला पैशांचा पाऊस पाडतो अन् अचानक…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!