पुणे जिल्हा हादरला! पित्याचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): आंबेगाव तालुक्यातील पारगाव (कारखाना) पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये नराधाम बापारने आपल्या अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवत वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पीडित मुलीने पारगाव (कारखाना) पोलिस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. नराधम बापावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका गावात पीडित मुलगी शिक्षण घेत असून, आईचा मृत्यू झालेला आहे. तिचे वडील शेती काम करत असून, मुलीला चाकूचा धाक दाखवत वडिलांनी मे 2023 ते 17 /7/ 2023 रोजी पर्यंत वारंवार बलात्कार केला आहे. पीडीत मुलीच्या वडिलांनी घरी कोणी नसताना राहते घरी व घराच्या लगतच्या मोकळ्या जागेत चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, अशी फिर्याद मुलीने पारगाव (कारखाना) पोलिस स्टेशन मध्ये दिली आहे.
दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सपोनि लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हाचा तपास पोलिस उपनिरीक्षक लोकरे करत आहेत.
प्रियकरासमोर विधवा महिलेवर दोघांचा चालत्या जीपमध्ये बलात्कार…
अभिनेत्रीवर बलात्कार आणि मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक…
धक्कादायक! सावकाराने पतीसमोरच पत्नीवर केला बलात्कार…
धक्कादायक! पुणे जिल्ह्यातील शाळेच्या बाथरूमध्ये मुलीवर बलात्कार…
धक्कादायक! अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्कार…