पत्नीला स्टीलच्या झाऱ्याने मारहाण केल्याने मृत्यू…

छत्रपती संभाजीनगर : नवऱ्याने घरगुती वादातून पत्नीला बेदम मारहाण केल्यामुळे पत्नीचा मृत्यू झाला आहे. प्रियंका संदीप राऊत असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. संदीप राऊत असे या प्रकरणातील आरोपी पतीचे नाव आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील रांजणगाव शेणपुंजीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पतीने घरगुती वादातून पत्नीला स्टीलच्या झाऱ्याने आणि लाथा बुक्क्याने बेदम मारहाण केली. या घटनेत प्रियंका राऊत यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पती संदीप राऊत याच्याविरोधात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हनिमूनच्या रात्रीच पत्नीने केली नवरदेवाला बेदम मारहाण…

धक्कादायक! पती-पत्नीने एकाच खोलीतून घेतला जगाचा निरोप…

हृदयद्रावक! पत्नी व दोन मुलांचे मृतदेह आणण्याची वेळ आली बापावर…

पत्नी आणि चिमुकली झोपली असताना घरात सोडला कोब्रा…

दिवाळीच्या दिवशीच पत्नीची गळा दाबून हत्या…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!