कल्याण मारहाण प्रकरण! मुख्य आरोपी शुक्लानंतर आणखी तिघांना बेड्या…

कल्याण: कल्याण येथील योगीधाम अजमेरा सोसायटीत मराठी व्यक्तीला मारहाण प्रकरणी पोलिसांनी अखिलेश शुक्ला याच्यासह त्याचे दोन सहकारी सुमित जाधव आणि दर्शन बोराडे यांना अटक केली होती. आता या प्रकरणात पोलिसांनी आणखी तीन जणांना अटक केली आहे.

अखिलेश शुक्ला नावाच्या व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या एका मराठी व्यक्तीवर हल्ला केला आहे. त्याने काही जणांना हाताशी धरून हा हल्ला केला. या हल्ल्यात अभिजीत देशमुख आणि इतर काहीजण जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरण चांगलंच तापलं आहे. परिसरातील मराठी नागरिकांनी एकत्र येत शुक्ला विरोधात आंदोलन आणि घोषणाबाजी केली. या सगळ्या घडामोडीनंतर आरोपी शुक्ला फरार झाला होता. मात्र शुक्रवारी त्याने पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. यावेळी पोलिसांनी अखिलेश शुक्ला याच्यासह त्याचे दोन सहकारी सुमित जाधव आणि दर्शन बोराडे यांना अटक केली होती. आता या प्रकरणात पोलिसांनी आणखी तीन जणांना अटक केली आहे. आज (शनिवार) सकाळी पोलिसांनी अखिलेश शुक्लाच्या पत्नी गीता शुक्लासह विवेक जाधव आणि पार्थ जाधव अशा तिघांना ताब्यात घेतले आहे. खडकपाडा पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. आतापर्यंत पोलिसांनी सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अद्याप चार आरोपी फरार आहे. सर्व फरार आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. व्हायरल व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी ओळख पटवून ही कारवाई केली आहे. अटक केलेल्या सर्व आरोपींना आज दुपारी कल्याण न्यायालयात हजार केले जाणार आहे. उर्वरीत आरोपींचा शोध खडकपाडा पोलिस घेत आहेत.

दरम्यान, कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसरात अजमेरा हाईटस इमारतीत बुधवारी झालेल्या राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या हाय प्रोफाईल इमारतीत अखिलेश शुक्ला हा अधिकारी वास्तव्यास आहे. त्याच्या शेजारी अभिजीत देशमुख आणि विजय कल्वीकट्टे राहतात. बुधवारी रात्री अखिलेश शुक्ला याने घराबाहेर धूप लावला होता. धूपाच्या धुराचा शेजाऱ्यांना त्रास होत होता. याबाबत शेजारी विजय कल्वीकट्टे याने शुक्ला याला टोकले. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. शुक्ला याने आपल्या मित्रांना बोलावून अभिजीत देशमुख यांना मारहाण केली. या वादात हस्तेक्षेप करण्यास गेलेल्यांनाही शुक्लाने मारहाण केली होती.

मराठी कुटुंबाला मारहाण करणारा अखिलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यात; म्हणाला…

एलिफंटा बोट दुर्घटनेची थरारक स्टोरी; दुर्घटनेतील मृतांची नावं समोर…

हृदयद्रावक! नाशिकचे कुटुंब उपचारासाठी मुंबईला अन् समुद्रात बुडाले…

मुंबईतील बेस्ट अपघातातील मृतांचा आकडा वाढला; पाहा मृतांची नावे…

मुंबई पुन्हा हिट ऍण्ड रन, मॉडेलचा जागीच मृत्यू…

धक्कादायक! मुंबईत पायलट युवतीने केली आत्महत्या; प्रियकर ताब्यात…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!