घाटंजी पोलिसांची मुर्ली येथील जुगार अड्डयावर धाड; आरोपींमध्ये शिक्षक…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील मुर्ली येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या शेतात (जागेवर) जुगार खेळताना पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांनी घटनास्थळावरून मुद्देमाल जप्त केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
संशयीत आरोपी प्रविण दोनाळकर (वय 57, रा. नेहरु नगर घाटंजी), दिनेश खांडरे (वय 42, रा. राम मंदीर घाटंजी), अनिल कापसे (वय 49, रा. नेहरु नगर घाटंजी), सुभाष कणाके (वय 45, रा. ईस्तारी नगर घाटंजी), मंदार भुसारी (वय 38, रा. नेहरु नगर घाटंजी), अरुण हेडाउ (वय 58, रा. ईस्तारी नगर घाटंजी), विलास करपे (वय 59, जेसीस कॉलनी घाटंजी), किरण सोनडवले (वय 44, ईस्तारी नगर घाटंजी), स्वरुप नव्हाते (वय 52, रा. शिवाजी वार्ड घाटंजी) आदी 9 आरोपी विरुद्ध घाटंजी पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक नागेश अंबादास खाडे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 चे कलम 12 (a) अंतर्गत घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच आरोपींकडून मोबाईल फोन, मोपेड, मोटार सायकल, रोख रक्कम असे मिळुन 4 लाख 84 हजार 445 रुपयाचा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त करण्यात आला आहे. घाटंजी पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक नागेश खाडे हे आपल्या पथकासह पुढील तपास करीत आहे.
घाटंजी पोलिस ठाण्यात पोलिस खब-या कडुन मिळालेल्या माहितीनुसार, मुर्ली येथील एका शेतात जुगार सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार घाटंजी पोलिस ठाण्यातील पोलिस उप निरीक्षक नागेश खाडे यांनी आपल्या पोलिस पथकासह छापा टाकला असता, मुर्ली गावाच्या जवळ असलेल्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या (घाटंजी) शेतात काही जण घोळका करुन पैशाची बाजी लावून एक्का बादशहा नावाचा जुगार खेळतांना दिसले. तत्पूर्वी, 1 डिसेंबर 2023 रोजी घाटंजी पोलिसांना यवतमाळचे पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्यात यावी, या बाबत पत्रव्यवहार केला होता, हे विशेष. त्यामुळे घाटंजी तालुक्यातील अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी घाटंजी पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्या निर्देशानुसार पोलिस उप निरीक्षक नागेश खाडे यांनी स्टेशन डायरीवर नोंद करुन पोलिस नायक विनोद मेश्राम, पोलिस शिपाई अमितकुमार लोखंडे यांना घेऊन ते मुर्ली गावाजवळ असलेल्या एस. पी. एम. महाविद्यालय यांच्या नांवे असलेल्या शेतातील कोठ्या समोर असलेल्या एका झाडा खाली धाड टाकली असता, तेथे जुगार खेळतांना 9 जण जागीच आढळून आले. या वेळी जुगार खेळतांना पंचासमक्ष पंचनामा करण्यात आला. आरोपींची अंगझडती घेतली असता मोबाईल फोन, मोपेड, मोटार सायकल व रोख रक्कम असा एकूण 4 लाख 84 हजार 445 रुपयाचा मुद्देमाल घाटंजी पोलिसांनी जप्त केला आहे.
यवतमाळचे पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, पांढरकवडा येथील उप विभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजणे, घाटंजीचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक नागेश खाडे हे आपल्या पोलिस पथकासह पुढील तपास करीत आहे. विशेष म्हणजे जुगारातील काही आरोपी हे घाटंजी येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या (SPM) विद्यालयातील शिक्षक, लिपीक, शिपाई इत्यादी असल्याचे समजते. पोलिस पुढील तपास करत आहेत.
शिक्षकाने स्वतःच्या जागी ठेवला रोजंदारीवर निवृत्त शिक्षक; वर्गातच जुगार…
गोंदिया जिल्ह्यात पोलिसांची अवैध धंद्यांविरुद्ध धडक कारवाई…
लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यावर छापेमारी; मुद्देमालासह फरार आरोपी जेरबंद…
पुणे शहरात भोंदू बाबा म्हणाला पैशांचा पाऊस पाडतो अन् अचानक…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!