प्रदीप पूर्णेकर हत्याकांडप्रकरणी सुभाष शिंदेच्या कोठडीत वाढ; शस्त्रे पुरवल्याचा पोलिसांना संशय…
ठाणे: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी सुभाष शिंदे उर्फ पप्या शिंदे याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने आणखी तीन दिवसांची वाढ केली आहे. त्याला १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेली दोन पिस्तुले आणि तीन चॉपर कोणी उपलब्ध करून दिले, तसेच फरार आरोपी संतोष […]
अधिक वाचा...डोबिंवलीत महाविद्यालयाजवळ अंमली पदार्थांची विक्री; विद्यार्थ्याला ओव्हरडोस; रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार…
डोंबिवली: डोंबिवली पूर्वेकडील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्याला अंमली पदार्थांचा ओव्हरडोस झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी ड्रग विक्री करणाऱ्यांविरोधात डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शैक्षणिक संस्थांच्या परिसरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. संबंधित विद्यार्थी अचानक आजारी पडल्याने त्याला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. […]
अधिक वाचा...सातबारा वारस नोंदीसाठी एक लाखाची लाच; कोप्रोलीचे मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात…
उरण: सातबारा पत्रकावर वारसाची नोंद करण्यासाठी तब्बल एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना, कोप्रोलीचे मंडळ अधिकारी मौजे चिरनेर येथील तलाठी आणि कार्यालयातील कोतवाल यांच्यावर नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली आहे. त्यात मंडळ अधिकारी आणि कोतवाल रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मौजे चिरनेर येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतजमिनीच्या सातबारा उतारावर वारस नोंद […]
अधिक वाचा...नवविवाहित युवक आणि युवतीच्या पायाला साखळी अन् कुलुप; नदीत दोघांचे मृतदेह…
धुळे : धुळे जिल्ह्यातील तापी नदीत युवती आणि युवकाचे पाय एकमेकांना साखळीने बांधलेले आणि त्याला कुलूप लावले होते. दोघांनीही एकत्र मृत्यूला कवटाळल्याचा अंदाज आहे. मात्र, त्याआधी युवकाने पत्नीच्या भावाला मध्यरात्री फोन करुन चार शब्दात आपली व्यथा व्यक्त केली होती, अशी माहिती मिळत आहे. श्याम पाटील (वय ३५) आणि त्यांची पत्नी सपना पाटील (वय १९) अशी […]
अधिक वाचा...धक्कादायक! पत्नीचे नको त्या अवस्थेतील फोटो पाहून नवरा हादरला…
छत्रपती संभाजीनगर : एकाने इन्स्टाग्रामवर फेक अकाऊंट बनवून विवाहितेचे अश्लील फोटो पोस्ट केले असून, त्याने पीडितेचे फोटो तिच्या पतीसह भाऊ आणि इतर नातलगांना पाठवले. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. विवाहितेचे (वय ३०) फोटो वापरून इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट तयार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपीने या बनावट अकाउंटवरून अत्यंत अश्लील […]
अधिक वाचा...पुणे MPSC आंदोलनाबाबत दुसरा गुन्हा दाखल; पाहा नावे…
पुणे: MPSC आंदोलनासंदर्भात विश्रामबाग पोलिस ठाण्यात आता दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान विनापरवाना ड्रोन उडवल्याप्रकरणी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासह प्रमोद पाटील, दिगंबर खाडे, ऋषिकेश गांगुर्डे आणि अक्षय कांबळे यांच्याविरुद्ध ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान ड्रोनद्वारे चित्रीकरण (शूटिंग) करण्यात आले होते. मात्र, हे ड्रोन उडवण्यासाठी किंवा शूटिंग करण्यासाठी […]
अधिक वाचा...माथाडी कामगार प्रकरणात ४३ हजार रुपयांच्या लाच प्रकरणी बोर्ड इन्स्पेक्टर व सुरक्षा रक्षकाला अटक…
नवी मुंबई: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) नवी मुंबई शाखेने तुर्भे येथील एपीएमसी कार्यालयात मुंबई किराणा बाजार आणि दुकान मंडळाचा एक वर्ग ३ अधिकारी आणि एका सुरक्षा रक्षकाला ४३ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. आरोपींची ओळख बोर्डातील ग्रेडिंग प्रभारी निरीक्षक भरत राजाराम कदम (वय ५६) आणि सुरक्षा रक्षक विजय नारायण पवार (वय ३८) अशी पटली […]
अधिक वाचा...सचिन वाझेच्या जामिनाला विरोध का? मुंबई उच्च न्यायालयाचा राष्ट्रीय तपास यंत्रणेला प्रश्न…
मुंबई: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या मलबार हिलवरील अँटिलिया, या निवासस्थानकासमोर एका गाडीमध्ये ठेवलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे याला विशेष एनआयए न्यायालयाने जामीन मंजूर केला. परंतु, अत्यंत कठोर अटी व शर्ती घातलेल्या असतानाही राष्ट्रीय तपास यंत्रणेचा (एनआयए) या जामीनाला विरोध का आहे, असा थेट प्रश्न मुंबई उच्च […]
अधिक वाचा...एमपीएससी आंदोलनात उपोषण सोडताच पुणे पोलिसांकडून 15 जणांविरोधात गुन्हा दाखल; पाहा नावे…
पुणे : पुण्यातील एस.एम जोशी पूलावर आंदोलन करणाऱ्या 15 जणांविरुद्ध अखेर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आंदोलन करण्यासाठी पोलिसांना पत्र दिल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, भेटीदरम्यान त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या होत्या, त्यामुळे आंदोलन स्थगिती केल्याचे पत्र त्यांनी पोलिस आयुक्तांना दिले होते. परंतु सकारात्मक वाटाघाटी करून आल्यानंतरही कोणतीही पूर्वकल्पना न देता […]
अधिक वाचा...मंत्रालयातील उच्च पदावरील महिला अधिकाऱ्याला लाखोंचा गंडा; मला तुझ्याशी लग्न करायचंय…
मुंबईः मंत्रालयात काम करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याला मेट्रिमोनिअल साईटवरून जोडीदार शोधणं महागात पडले असून, तिची १८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर महिलेनं तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिला या मंत्रालयातील एका विभागात अधिकारी म्हणून सेवेत आहेत. योग्य जोडीदाराच्या […]
अधिक वाचा...
