जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार; चकमकीत 4 जवान हुतात्मा…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील डोडा परिसरात सोमवारी (ता. १५) रात्री अचानक दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या तुकडीवर हल्ला केला. यावेळी दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या चकमकीत झाली. चकमकीत चार जवान हुतात्मा झाले आहेत.
‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
जम्मूच्या डोडा जिल्ह्यातील धारी घोट उरारबागी परिसरातील जंगलात सोमवारी रात्री उशिरा ही चकमक सुरू झाली. जम्मू-काश्मीर पोलीस आणि जवान दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन करत आहेत. डोडा महामार्गावर हाय अलर्ट देण्यात आला आहे. भारतीय सैन्यदलाची नजर या भागावर आहे. प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येत आहे. डोडामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे कारवाई करण्यासाठी जात असताना अचानक गोळीबार सुरू झाला. भारतीय जवानांनी दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र या चकमकीदरम्यान चार जवान हुतात्मा झाले. जवानांकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, अमरनाथ यात्रेला दहशतवादी टार्गेट करणार असल्याची माहिती मिळाली होती. मात्र दहशतवाद्यांचा हाच डाव भारतीय सैन्यदलाने उधळून लावला होता. त्यानंतर आता डोडा परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. तिथे कारवाईसाठी जात असताना चकमक झाली आणि हा प्रकार घडला आहे.
हुतात्मा जवानाच्या वडिलांचे आरोप; सून सगळं घेऊन गेली…
पाकिस्तानमधून परतलेले जवान चंदू चव्हाण यांची शेअर मार्केटच्या नावाखाली आर्थिक फसवणूक!
काश्मीरमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांची हृदयद्रावक कहानी…
Video: जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात 4 जवान हुतात्मा…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…