
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या बंगल्यात पोलिस कर्मचाऱ्याकडून कार घुसवण्याचा प्रयत्न अन्…
पुणे: पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या शासकीय निवासस्थानी (बंगल्यावर) कार घुसवायचा प्रयत्न करणाऱ्या एका मद्यधुंद पोलिस कॉन्स्टेबलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बदलीच्या कारणावरून आलेल्या रागातून या कॉन्स्टेबलने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिस कॉन्स्टेबल अमोल भिसे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल भिसे यांनी पोलिस आयुक्तांच्या आणि आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला असा आरोप आहे. अमोल भिसे हे पुणे पोलिस मुख्यालयात कार्यरत होते. काल पुण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. भिसे यांना पुण्यातील एका पोलिस स्टेशनला बदली हवी होती. त्यासाठी ते प्रयत्न करत होते. मात्र बदली न झाल्यानं चिडून त्यांनी हे कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे. अमोल भिसे त्यावेळी दारुच्या नशेत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
View this post on Instagram
अमोल भिसे यांनी मद्यधुंद अवस्थेत थेट पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या शासकीय निवासस्थानाचा रस्ता धरला. त्यांनी त्यांच्याकडे असलेली कार पोलिस आयुक्तांच्या बंगल्याच्या मुख्य दरवाजावर नेऊन जोरात ठोकली आणि जबरदस्तीने आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मुख्य प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी प्रसंगावधान राखून भिसे यांना तातडीने ताब्यात घेतले. या घटनेदरम्यान कॉन्स्टेबल अमोल भिसे हे दारूच्या नशेत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा आणि शिस्तीचा प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाला असून, स्वतःच्याच दलातील कर्मचाऱ्याने अशा प्रकारे कायदा हातात घेतल्याने पुणे पोलिस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सुमारे अर्धा तास त्याने तिथे उपस्थित कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत जाब विचारल्याची माहिती समोर आली आहे. या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यावर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अमोल भिसे या पोलिस कर्मचाऱ्याला यापूर्वी काही कारणांवरून सेवेतून निलंबित करण्यात आले होते. या कारवाईनंतर त्याला पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले होते. मात्र त्याला हवी तशी किंवा मनासारखी बदली मिळाली नव्हती. याच कारणावरून तो अत्यंत नाराज आणि त्रस्त होता. पोलिस आयुक्तांच्या बदल्यांबाबतच्या धोरणावर आणि मनमानी कारभारावर प्रचंड राग मनात धरून, दारूच्या नशेत त्याने थेट पोलिस आयुक्तांचा बंगला गाठला आणि जोरदार राडा केला.
पुणे शहराच्या पोलिस प्रमुखांच्या बंगल्यावरच एका पोलिस कर्मचाऱ्याने थेट आत शिरून अर्धा तास शिवीगाळ आणि गोंधळ घातल्यामुळे पोलिस दलातील शिस्तीवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अमोल भिसे याच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे आणि दारूच्या नशेत गोंधळ घातल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात अधिकृत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेमुळे पुणे पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
View this post on Instagram
पुणे पोलिस दलातील पोलिसाचा कारनामा अन् सेवेतून बडतर्फ…
पुणे पोलिसात भरती मोठा घोटाळा! नोकरी जाणार…
पुणे पोलिस दलातील हवालदाराचा बंदोबस्तादरम्यान हृदयविकाराने मृत्यू…
पुणे पोलिस दलात एकच खळबळ! 32 कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…
पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याची गळफास घेत आत्महत्या…

