…अखेर भाजप नेत्या सना खान यांच्या हत्येचं गुढ उलगडलं
नागपूर: भाजप नेत्या सना खान यांच्या हत्येचे गुढ उलगडले आहे. प्रमुख संशयित आरोपी अमित साहू याला नागपूर पोलिसांनी जबलपूरमधून अटक करून नागपुरात आणले आहे. अमित साहू हा सना खान यांचा पती असून त्याने सना खान यांची हत्या केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. अमित साहू याने सना खान यांचा खून केल्यानंतर मृतदेह हिरण नदीत फेकल्याची माहिती […]
अधिक वाचा...I-Phone, I-Pad, Smart Watch चोरणाऱ्यांना युनिट -2 ने केले जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): ब्लू डार्ट कंपनीच्या गाडीतून महागडे मोबाईल चोरणाऱ्या आरोपींना युनिट -2 ने 24 तासात जेरबंद केले असून, 3,90,445 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. दिनांक 10/08/2023 रोजी रात्री सहकारनगर पोलिस स्टेशन गु र. क्र.193/2023 भादवि कलम 379 अन्वय ब्लू डार्ट एक्सप्रेस कुरिअर कंपनीचे मालवाहतुकी दरम्यान APPLE कंपनीचे I-PHONE, I-PAD […]
अधिक वाचा...येरवडा कारागृहातील कैद्यांकडे आढळले मोबाईल; गुन्हा दाखल…
पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांकडे दोन मोबाइल, दोन बॅटऱ्या आणि एक सिमकार्ड सापडले आहे. याबाबत तुरुंगाधिकारी रेवनाथ कडू कानडे (वय 54) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी न्यायबंदी तालीम मोहम्मद खान, राजु तुकाराम अस्वले, सचिन उर्फ पप्पू दत्तात्रय घोलप व आकाश उत्तम रणदिवे यांच्याविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात कारागृह कायदा 1894 नियम 42, 45 (12) आयपीसी […]
अधिक वाचा...धुळे जिल्ह्यात दोन गटात राडा; दगडफेकीत 15 पोलिसांसह स्थानिक जखमी…
धुळे : धुळे जिल्ह्यातील सांगवी (शिरपूर) येथे गुरुवारी (ता. 10) सायंकाळच्या सुमारास बॅनर फाडण्यावरुन दोन गटात वाद निर्माण झाला. दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत 15 पोलिस कर्मचारी आणि तीन ते चार स्थानिक नागिरक किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी 150 ते 200 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी 13 जणांना अटक […]
अधिक वाचा...भाजप पदाधिकारी सना खान प्रकरणात गुन्हा दाखल; नोकराने सांगितले की…
नागपूर : भाजप पदाधिकारी सना खान या गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानकापूर पोलिस स्टेशनमध्ये मेहरूनिसा खान यांच्या तक्रारीवरून आरोपी पप्पू साहूविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जबलपूर पोलिस प्रकरणाचा योग्य तपास करत नसल्याने नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास पथक जबलपूरला रवाना केले आहे. जबलपूर येथील […]
अधिक वाचा...पुणे शहरातील आयटी अभियंत्याचा मारेकरी अटकेत, हत्येचे कारणही समोर…
पुणे: आयटी अभियंता सौरभ नंदलाल पाटील (वय 23) हत्या प्रकरणात त्याच्या गावातीलच एकाला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. कोपरगावात या दोघांमध्ये काही महिन्यांपूर्वी मोठा वाद झाला होता. त्यातूनच ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पुणे-नाशिक महामार्गावरील खेड राजगुरुनगर घाटात 6 ऑगस्ट रोजी सौरभचा मृतदेह आढळला होता. सौरभ हा 28 […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये टोळक्याने केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू…
नाशिक: नाशिक शहरातील अंबड लिंक रोडवर दहा ते बारा जणांनी धारदार शस्त्राने दोन युवकांवर प्राणघातक हल्ला केला असून, यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. मेराज खान (वय 18), इब्राईम शेख (वय २३) असे मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून ही हत्या झाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. नाशिकच्या अंबड लिंक रोडवर गुरुवारी (ता. […]
अधिक वाचा...खाजगी रुग्णालयात गेलेल्या महिलेचा तासाभरातच मृत्यू…
कल्याण: मूल होत नसल्यामुळे हिस्ट्रोलेप्रोस्कोपीसाठी खाजगी रुग्णालयात गेलेल्या महिलेचा लेप्रोस्कोपी सुरु असताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पूजा लोखंडे असे मृत महिलेचे नाव आहे. कल्याण अॅपेक्स रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. रुग्णालयातील डॉक्टर मानसी घोसाळकर यांनी मात्र आरोप फेटाळले आहेत. महिलेला वाचवण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न केले. […]
अधिक वाचा...अहमदनगर जिल्ह्यामध्ये मंदिरातील फोडल्या चार दानपेट्या…
अहमदनगर: पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र वृद्धेश्वर मंदिरातील चार दान पेट्या फोडून त्यातील रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. श्रीक्षेत्र वृद्धेश्वर मंदिरातील चोरीचा हा प्रकार दुसर्या दिवशी मंदिराचे पुजारी आणि कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला. श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे मंगळवारी रात्री नऊची आरती आटोपल्यानंतर देवस्थान समितीने मंदिर बंद केले होते. मध्यरात्री […]
अधिक वाचा...आमदारपुत्राची दादागिरी; बंदुकीच्या धाकाने व्यावसायिकाचे अपहरण…
मुंबई : आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे याच्याविरोधात वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अपहरण करून मारहाण केल्याची तक्रार व्यावसायिकाने केली आहे. खोट्या मनिलाँड्रिंग केसमध्ये गोवण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. मुंबईतील एका व्यावसायिकाचे बंदुकीच्या धाकावर अपहरण केल्याप्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज याच्या सह १० ते १५ जणांविरोधात गुन्हा दाखल […]
अधिक वाचा...
